Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुलभ शौचालय महिलांसाठी मोफत करावे

माजी नगराध्यक्ष पाटील यांची बस आगारप्रमुखांकडे मागणी

कोपरगाव शहर ः कोपरगाव बसस्थानक मध्ये महिलांसाठी असलेले सुलभ शौचालय स्वच्छ ठेवून ते निशुल्क करावे तसेच बस स्थानकात येणारे ब बाहेर जाणारे दोन्ही मु

पंचायत समिती पदाधिकारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात
सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावे
संजीवणी युवा प्रतिष्ठाणच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कोपरगाव शहर ः कोपरगाव बसस्थानक मध्ये महिलांसाठी असलेले सुलभ शौचालय स्वच्छ ठेवून ते निशुल्क करावे तसेच बस स्थानकात येणारे ब बाहेर जाणारे दोन्ही मुख्य रस्ते तातडीने बुजवावे अशी मागणी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्या कोपरगाव बस स्टॅन्ड येथे तक्रार निवारणासाठी आलेल्या असताना समक्ष भेटून दिले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, यांत्रिकी प्रमुख पंडित, आगार प्रमुख अमोल बनकर, स्थानिक प्रमुख योगेश दिघे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाना आहेर यांचेसह नागरिक उपस्थित होते.
कोपरगाव शहरात ग्रामीण भागातून शालेय शिक्षणासाठी, कॉलेजसाठी मुली, शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने गावाच्या ठिकाणी रोज ये जा करत असतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब  नागरिकांसाठी कोपरगाव शहरात येणे जाण्यासाठी बस हे एकमेव परवडणार साधन आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट की बस स्टॅन्ड मध्ये आत येताना व बाहेर जाताना जे दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसामुळे पाणी साचले आहे व ते मुला मुलींच्या नागरिकांच्या एसटी बस व वाहन गेले की अंगावर उडत असते त्यामुळे सर्वाना त्याचा त्रास होतो त्यामुळे तातडीने हे खड्डे बुजवावे तसेच बस स्टॅन्ड मधील सुलभ शौचालयात पैसे आकारले जातात ते शालेय व महाविद्यालयीन मुलींना नागरिकांना महिलांना परवडणारे नाही. बस स्थानकाची सुलभ शौचालय उभारून ते स्वच्छ ठेवणे व निशुल्क देणे ही जबाबदारी बस डिपार्टमेंटची आहे. त्यामुळे बस स्थानक प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे न बुजविल्यास तसेच शौचालयात आकारात असलेले पैसे घेणे बंद न केल्यास शाळकरी महाविद्यालयीन मुलींना व ग्रामीण भागातील महिला भगिनींना सोबत घेऊन बस स्टँडवर सर्व बस गाड्या थांबून आंदोलन करावे लागेल असा इशारा पाटील यांनी या प्रसंगी दिला.

हद्दीच्या वादात नागरिकांचे हाल – मुख्य प्रवेशद्वारामधील आत व बाहेर जाणार्‍या रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांबाबत बोलताना अधिकारी म्हणाले की ती हद्द नगरपालिकेची आहे. आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला कळवले पण अद्याप नगरपालिका ते करून देत नाहीत. यामुळे नगरपालिका आणि बस स्टँडच्या जागेच्या हक्काच्या वादात नागरिकांचे हाल होत आहे.

COMMENTS