Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प. पदभरती आता या संवर्गांची होणार परीक्षा

आरोग्य सेवक (पुरुष), कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी होणार परीक्षा

नाशिक : जिल्हा परिषद पदभरती २०२३ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प

जन्मदात्या आईनेच घेतला पोटच्या मुलांचा जीव
गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई होणार
सभेतून बोलल्याने मत मिळत नाही बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका

नाशिक : जिल्हा परिषद पदभरती २०२३ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता  आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), कंत्राटी ग्रामसेवक या ३ संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर दि. २० ते ३० जुलै या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षांसाठी ८६७१ परीक्षार्थी प्रविष्ठ होणार असून १० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणारआहे. यासाठी १८ व्हेन्यू ऑफिसर व २८९ निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहामध्ये परीक्षा कामकाजातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

हॉलतिकीट डाऊनलोड कुठून करावे  – जिल्हा परिषद पदभरतीतील ३ संवर्गाच्या परीक्षा या दि. २० ते ३० जुलै दरम्यान होणार असून आयबिपीएस कंपनीच्या http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडीवर देखील हॉल तिकीटची लिंक पाठवण्यात आलेली आहे.

कुठल्या पदासाठी कधी होणार परीक्षा –

१) आरोग्य सेवक (पुरुष) ४०% :  दि. २०, २२ व २३ जुलै

२) आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी): दि. १९ व २४ जुलै

३)कंत्राटी ग्रामसेवक  : दि. २५, २९ व ३० जुलै

COMMENTS