Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप शरद पवारांनीच दिले :भाजप नेते अमित शहा

पुणे : देशामध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक रून देण्याचे काम शरद पवारांनी केले. तेच सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहेत. आम्ही 2014 ला मराठा समाजाला आरक्

एसटी संप आणि त्यातील बरेच काही…
चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले
कराड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

पुणे : देशामध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक रून देण्याचे काम शरद पवारांनी केले. तेच सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहेत. आम्ही 2014 ला मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जाते अशी सडकून टीका भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर केली. पुण्यात महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन रविवारी पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना अमित शहा म्हणाले की, फेक नरेटिव्ह करून विरोधकांनी थोडा बहुत विजय मिळवला, पण आता विधानसभेत त्यांचा खोटारडापणा बाहेर पडेल, असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला. या बैठकीतील माझे शब्द लक्षात ठेवून घरी जा. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचंड बहुमतामध्ये महायुतीचे सरकार बनेल. अन् हे सरकार भाजपच्याच नेतृत्वाखाली बनेल, असा दावा त्यांनी केला. 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते
यावेळी भाजप नेते अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा देखीजल जोरदार समाचार घेतला. स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. काँग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. परंतु यांनी 60 वर्षांमध्ये गरीबांच्या कल्याणासाठी काय काम केले. हे काहीही करू शकत नाही. आरक्षणाचा अपप्रचार केला. संविधान हटावचा अपप्रचार केला, पण आता त्यांचा प्रचार आता चालणार नाही. लोकांना त्यांचा खोटा अपप्रचार समजला आहे, अशी टीका देखील शहा यांनी केली.

COMMENTS