नवी दिल्ली ः नीट परीक्षेच्या गैरव्यवहारप्रकरणी गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी झाली. यावेळी नीटची फेरपरीक्षा घेण्यावर चर्चा देखी
नवी दिल्ली ः नीट परीक्षेच्या गैरव्यवहारप्रकरणी गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी झाली. यावेळी नीटची फेरपरीक्षा घेण्यावर चर्चा देखील झाली. मात्र नीटचा हा घोटाळा केवळ 1 लाख विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित असल्यामुळे 23 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसवणे योग्य होणार नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
संपूर्ण परीक्षेत सुनियोजित घोटाळा झाला आहे त्याचा फटका सर्व 23 लाख परीक्षार्थींना बसलाय, असे कोर्टाला पटवून दिले तरच फेरपरीक्षेचे आदेश देणे संयुक्तिक होईल असे मत कोर्टाने व्यक्त केले. त्यानंतर फेरपरीक्षा घेऊ नये अशी एनटीए आणि केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यावर चर्चा करताना न्यायमूर्तींनी देशातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता किती याची माहिती घेतली. त्यानंतर नीटच्या कथित घोटाळ्यामुळे फक्त एक लाख आठ हजार परीक्षार्थीच बाधित होणार आहेत, असे मत व्यक्त केले. एक लाख विद्यार्थ्यांसाठी सर्व 23 लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा योग्य नसल्याचे मतही सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी व्यक्त केले. नीट पेपरफुटीचा सीबाअयने तपास सुरू केला असून, पाटणा येथुन बुधवारी 3 तर गुरूवारी 4 अशा चार विद्यार्थ्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 40 याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होत आहे. एक लाख विद्यार्थ्यांसाठी सर्व 23 लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा योग्य नसल्याचे मतही सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी व्यक्त केले. मात्र अशा ढोबळ विभागणीला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विरोध केला. वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठीच घोटाळा झाल्यामुळे फेर परीक्षेची मागणी केली. त्यावर संपूर्ण परीक्षेत सुनियोजित घोटाळा झाला आहे त्याचा फटका सर्व 23 लाख परीक्षार्थींना बसला, असे कोर्टाला पटवून दिले तरच फएरपरीक्षेचे आदेश देणे संयुक्तिक होईल असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे.
चार विद्यार्थी ’सीबीआय’च्या ताब्यात – नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी सीबीआयने पाटणा एम्सच्या चार वैद्यकीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तिघांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. सीबीआयच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी गुरूवारी एक विद्यार्थी स्वतःहून सीबीआयसमोर हजर झाला. सर्वांचे लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा आरोप होत आहे. सीबीआयने ताब्यात घेतलेले तीन वैद्यकीय विद्यार्थी हे 2021च् या नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. वसतिगृहातील त्यांच्या खोलीही सील करण्यात आली आहे. चंदन सिंग, राहुल आनंद, करण जैन आणि कुमार सानू अशी ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. चंदन सिवान, कुमार सानू हे पटणा येथील राहुल धनबाद तर करण जैन हा अररियाचे रहिवासी आहे. सीबीआयने तीन विद्यार्थ्यांच्या खोल्या सील केल्या होत्या.
COMMENTS