Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराडकरांची तहान भागविण्यासाठी डॉ. अतुल भोसले मैदानात

कृष्णा समूहाच्या सुमारे 15 टँकरद्वारे शहरात अहोरात्र पाणीपुरवठा सुरूकराड / प्रतिनिधी : कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणी पुरवठा

विशाखा साळुंखे हिला राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक
एसटीच्या संपामुळे टीईटी परीक्षेस 1634 गैरहजर
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई सुरू

कृष्णा समूहाच्या सुमारे 15 टँकरद्वारे शहरात अहोरात्र पाणीपुरवठा सुरू
कराड / प्रतिनिधी : कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने, कराड शहरावासियांना गेल्या 3 दिवसांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने कराडवासीयांची त्रेधातिरपीट उडाली आहे. विशेषतः महिला वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत कराडकरांची तहान भागविण्यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले मैदानात उतरले आहेत. कृष्णा समूहाच्या माध्यमातून मंगळवार, दि. 16 पासून सुमारे 15 टँकरच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी अहोरात्र पाणी पुरवठा केला जात असल्याचे, शहरवासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या 3 दिवसांपासून कराड शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. अतुल भोसले यांनी मंगळवारी पंपिंग स्टेशनला भेट देऊन, पालिकेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जुन्या पंपिंग स्टेशनमधील काम तातडीने मार्गी लावून, शहराचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या.

कराडवासियांची पाण्याविना गैरसोय होऊ नये, यासाठी जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत शहरवासियांना पाण्याचा पुरवठा करण्याचे शिवधनुष्य डॉ. अतुल भोसले यांनी हाती घेतले आहे. यासाठी कृष्णा समूहाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी सुमारे 15 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. कृष्णा विश्‍व विद्यापीठाच्या जलशुध्दीकरण प्रकल्पातून पाणी भरुन हे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. गेल्या 2 दिवसांत लाखो लीटर पाण्याचा पुरवठा या माध्यमातून करण्यात आल्याने, शहरवासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
डॉ. भोसले यांनी आज शहरात ठिकठिकाणी कृष्णा व समूहाच्या टँकरद्वारे होत असलेल्या पाणी पुरवठा व्यवस्थेची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. शहरात गरज भासेल त्याठिकाणी कृष्णा समूहाच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी पाणी उकळून, गाळून प्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS