Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून कराडकरांसह लोकप्रतिनिधींची दिशाभूल

कराड / प्रतिनिधी : पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे कराड शहरात पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, यासाठी प्रशासनाने वेळीच ख

४०० फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकली l LokNews24
वाचकांकडून वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान
प्रकाशच्या कोरोना योध्दांना न्यायालयाचा दिलासा अंतिम अटकपुर्व जामीन मंजुर

कराड / प्रतिनिधी : पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे कराड शहरात पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, यासाठी प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही. डी. पी. जैन व एमजीपी कंपनीने नवीन पुलावरून पाईपलाईन करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी, चुकीची दिशाभूल कराडकर आणि लोकप्रतिनिधीची केली जात असल्याचा आरोप उपस्थित माजी नगरसेवकांनी केला.
बैठकीत माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सुभाषराव पाटील, जयवंत पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, हणमंतराव पवार, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, काँग्रेसचे शिवराज मोरे, झाकिर पठाण, ऋतुराज मोरे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी अधिकार्यांची व नगरपालिका प्रशासनाची झाडाझडती घेतली.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कोयना पुलाच्या नवीन काम सुरू केले आहे. या कामामध्ये डीपी जैन व यांनी नदीत बांध घालून नैसर्गिक जलस्त्रोत बंद केला आहे. नदीच्या पात्रात 100 फुटाची चर काढल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे कराडला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनला धोका निर्माण झाला. पुलाखालून क्रॉस झालेली पाईपलाईनला धक्का बसला आहे. त्यामुळे कराडवर पाण्याचे संकट या कंपन्यांमुळे ओढवले आहे. ऐन पावसाळ्यात केलेल्या या चुकीचा फटका संपूर्ण कराड शहराला बसला आहे. नदीत बांध घालण्याचा अधिकार या कंपनीला नसताना त्यांनी बांध घालण्याचे पूर्णत: चुकीचे काम केले आहे. डी. पी. जैन व एमजीपी कंपनीने हे नुकसान भरून द्यावे व पाणी पुरवठा करणार्‍या पाईप लाईन दुरूस्त कराव्यात. डी. पी. जैन व एमजीपी कंपनीने आ. बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण तसेच जिल्हाधिकारी यांना चुकीची माहिती देवून दिशाभूल करत असल्याचा आरोप राजेंद्रसिंह यादव यांनी केला. तसेच मलकापूरला ड्रेनेज नसल्याने दरवर्षी पावसात संगम हॉटेल तसेच पोपटभाई पेट्रोलपंपासमोर पाणी साचून राहते. त्यामुळे मलकापूरचे मैला मिश्रित पाणी कराडमध्ये येत असल्याने या मैल्याचे संकट 14 वर्षे झाले कराड भोगत आहे. महामार्ग अधिकार्‍यांनी या पाण्याचा निचरा करावा. त्याशिवाय कराडच्या हद्दीतून जाणारे महामार्गाचे काम सुरू करून देणार नाही, असा इशाराही यावेळी राजेंद्रसिंह यादव यांनी दिला आहे. तसेच कराडचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्याची जबाबदारी डीपीजैन व एमजीपी कंपनी यांच्याकडेच असून त्यांनीच नुकसान भरपाई करावी, अशी मागणी यावेळी पदाधिकार्‍यांनी केली आहे.
राजेंद्रसिंह यादव आणि पालिका प्रशासनाच्यात खडाजंगी
डी. पी. जैन कंपनीकडून कोयना नदीमध्ये पुलाचे काम सुरू असून तेथे कराडला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन 200 फुटावरती खाली आहे. याची माहिती पालिका प्रशासनाने यापूर्वी का दिली नाही. पालिकेची काही जबाबदारी होती की नाही असा प्रश्‍न राजेंद्रसिंह यादव यांनी उपस्थित केला. यावेळी अभियंता ए. आर. पवार माहिती देण्यासाठी पुढे सरकले असता राजेंद्रसिंह यादव यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट तुम्ही मध्ये बोलूच नका अन् कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, असे म्हटले. दुसरीकडे शेजारीच बसलेले मुख्याधिकारी शंकर खंदारे मध्येच बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेंव्हा यादव यांनी मुख्याधिकारी साहेब तुम्ही हवेत आहात. तेंव्हा जरा कराडच्या लोकांसाठी रस्त्यावर खाली उतरा. तुम्ही लोकांसाठी कुठेच दिसत नाही, असा थेट आरोपच केला.
पालिकेच्या कर्मचार्‍यांना मुख्याधिकार्‍यांना सज्जड दमच
माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कर्मचार्‍यांना बोलावून काही प्रश्‍न केले आणि माहिती विचारली. यावेळी उपस्थित हनुमंतराव पवार, विजय वाटेगावकर, सुभाष पाटील यांनीही काही प्रश्‍न विचारले. त्यावरती कर्मचारी बोलू लागले. सदरील माहिती कर्मचार्‍यांकडून घेत असताना मुख्याधिकार्‍यांना सदरील माहिती नसल्याने ते चांगलेच भडकले. थेट त्यांनी कर्मचार्‍यांना तुम्ही मध्ये बोलू नका, मला माहिती दिल्याशिवाय तुम्ही कोणालाही काही माहिती सांगायची नाही. काहीच बोलायचे नाही असा सज्जड दमच उपस्थित माजी नगरसेवक यांच्यासमोर कर्मचार्‍यांना मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिला.

COMMENTS