Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ता मंजूर होऊनही विद्यार्थ्यांची चिखलातून कसरत  

पालकांमध्ये तीव्र संताप; काम त्वरित सुरू करण्याची मागणी

कोपरगाव तालुका ः नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नाटेगाव ते नांदेसर शिव रस्त्याचे साधारण तीन चारशे फूट काँक्रीटिकरण मंजूर होऊनही विद्यार्थ्यांना रोज

स्वस्तात सोने देणार अखेर पोलिसांनी केले गजाआड
सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी जनजागृती आवश्यक ः अ‍ॅड. शिंदे
शंकर भालेकर यांचे निधन

कोपरगाव तालुका ः नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नाटेगाव ते नांदेसर शिव रस्त्याचे साधारण तीन चारशे फूट काँक्रीटिकरण मंजूर होऊनही विद्यार्थ्यांना रोज शाळेत येताना चिखलातून कसरत करावी लागते. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून लवकरच मंजूर रस्त्याचे काम त्वरित सूरु करावे म्हणून कोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना भेटून मागणी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, नाटेगाव ग्राम पंचायत हद्दीतील नाटेगाव-नांदेसर शिवरस्ता हा सुमारे शंभर वर्षापासून वहिवाट असलेला रस्ता असून या भागात गावातील अनेक ग्रामस्थ शेतात वस्ती करून राहतात त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेक वेळा कऱण्यात आली. मागील काही वर्षा पूर्वी या रस्त्यावर दलीत वस्ती योजनेतून खडीकरण कऱण्यात आले होते. मात्र गावापासून साधारण चार पाचशे फूट रस्त्याचा भाग खोलगट असल्याने या ठिकाणी पाणी साचून रस्त्याने ये जा करणे अवघड झाले, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. तत्कालिन गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी केली. व बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना रस्त्याच्या कामाबाबत आदेश दिला त्यातून या भागात चार पाचशे फूट रस्त्यावर काँक्रीटिकरण मंजूर केले. पावसाळ्याच्या सुरुवातीला या रस्त्याला निधी मिळाला कामाचे टेंडर निघाले टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली मात्र अजुन कामाला सुरूवात झाली नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी काम सूरु करावे अशी मागणी केली मात्र ग्रामसेविका यांच्या निष्काळजी पना मूळे अद्याप काम सुरु झाले नाही, त्यामुळे शाळेत जाणार्‍या मुलांना रोजच चिखलातून पायी कसरत करावी लागत असून इतर ठिकाणी शूज शॉक्स घालून जाणार्‍या शाळेतील विद्यार्थी आपण पाहत असतो मात्र या भागातून शाळेत जाणार्‍या मुलांना रोजच चिखलातून पायी प्रवास करावा लागतो त्यामुळे वेळेवर या मुलांना पाय धुवायला पाणी उपलब्ध होत नाही. मुलांबरोबरच शेतकर्‍यांना शेतीमध्ये जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे तसेच दूध व्यावसायिक शेतकर्‍याना वयोवृद्ध व्यक्तींना दवाखान्यात जाता येत नाही, त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून या भागातील पालक लवकरच गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन मजूर काम त्वरित सुरु करावे अशी मागणी करणार आहे. जर काम वेळेत पूर्ण न झाल्यास पंचायत समिती समोर उपोषण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

COMMENTS