Homeताज्या बातम्यादेश

सीए परीक्षेत शिवम मिश्रा देशात पहिला

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया अर्थात सीए परीक्षेत मे 2024 मध्ये घेतलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेचा निकाल जाह

नगर-शिर्डी महामार्गासाठी नवीन निविदा काढून रस्त्याचा प्रश्‍न सोडवा
अजित पवार गटावर कारवाई करा
विधानपरिषद सभापतींची निवड याच अधिवेशनात ?

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया अर्थात सीए परीक्षेत मे 2024 मध्ये घेतलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. फायनलच्या परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्राने 500 गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावलं आहे. दिल्लीच्या वर्षा अरोरा हिनं 480 गुणांसह दुसरा तर, मुंबईच्या किरण राजेंद्र सिंग आणि नवी मुंबईच्या घिलमान सलीम अन्सारी या दोघांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.
भिवंडी येथील कुशाग्र रॉय याने सीए इंटरमिजिएट परीक्षेत 538 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. युग सचिन कारिया आणि यज्ञ ललित चांडक दुसरे आले. त्या दोघांनाही 526 गुण मिळाले. तिसरा क्रमांक दिल्लीचा मनितसिंग भाटिया आणि मुंबईचा हिरेश काशीरामका यांनी पटकावला आहे. त्यांना 519 गुण मिळाले आहेत. मे महिन्यात झालेल्या सीए फायनलच्या परीक्षेत 74,887 उमेदवारांनी गट 1 ची परीक्षा दिली होती, त्यापैकी फक्त 20,479 उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. गट 2 ची परीक्षा 58,891 उमेदवारांनी दिली होती, त्यापैकी केवळ 21,408 उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. दोन्ही गटातील 35,819 उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी केवळ 7122 उमेदवार उत्तीर्ण झाले. दोन्ही गटांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 19.88 टक्के आहे.

COMMENTS