Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गाला वर्षभरातच पडल्या भेगा

मुंबई : भाजप सरकारचा महत्वाकांक्षी नागपूर-मुंबई महामार्गावरील समृद्धी महामार्गावर वर्षभरातच भेगा पडल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावर सुरूवातीला ह

आजपासून मुंबई ते कोल्हापूर धावणार वंदे भारत
लोणंदच्या कु. पायल जाधव हिला कराड येथे तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
प्रदेशाध्यक्षांसमोरच उघड झाली शहराध्यक्षांवरील नाराजी

मुंबई : भाजप सरकारचा महत्वाकांक्षी नागपूर-मुंबई महामार्गावरील समृद्धी महामार्गावर वर्षभरातच भेगा पडल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावर सुरूवातीला होणार्‍या अपघातामुळे समृद्धी महामार्ग चर्चेत आला असतांनाच आता या रस्त्यावर भेगा पडल्याने या रस्त्यावरील कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होतांना दिसून येत आहे.
समृद्धी महामार्गासाठी एम-40 ग्रेडचे सिमेंट वापरण्यात आले असून तब्बल 20 वर्षे रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, असा दावा रस्ते बांधकाम कंपनी अर्थात एमएसआरडीसीने केला होता. मात्र, हा दावा एका वर्षातच खोटा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ 3 सेंमी रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. यातच महामार्गावर पडलेल्या भेगा आणि खड्यांमुळे अपघाताच्या घटनेत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, प्रशासनाने अद्यापही कोणती दखल घेतली नसल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. समृद्धी महामार्ग अद्याप मुंबईपर्यंत सुरूदेखील झाला नाही आणि वर्षभरातच अशी दुरवस्था झाली आहे तर, पुढे काय होणार असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग एकूण 701 किलोमीटरचा आहे. यापैकी आतापर्यंत 625 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यावेळी एमएसआरडीसीने मोठा गाजावाजा करीत हा रास्ता चांगल्या पद्धतीने बनवण्यात आल्याचा दावा केला होता. परंतु, पहिल्याच पावसात समृद्धी महामार्गावर अशी दुरवस्था झाल्याने वाहनचालकांनी डोक्यावर हात मारला. समृद्धी मार्गाच्या प्रोजेक्टमध्ये शासनाचे 20 हजार कोटी रुपये अतिरिक्त काढले गेले. यातून काही मंत्री आाणि अधिकार्‍यांना लाभ झाला, असा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केला आहे.

समृद्धी महामार्गावर पडला खड्डा – राज्याचा प्रसिद्ध समृद्धी महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे ऐन पावसाळ्यात या महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे. ठाण्यातील शहापूर परिसरातील समृद्धी महामार्गावर भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे समृद्धीच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते आणि पूल तयार करण्यात आले आहे. मात्र याच पूलाला भगदाड पडल्याचे दिसून आले आहे.

COMMENTS