अकोले ःअसल्याचे आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे उपाध्यक्ष सी.बी.भांगरे यांनी म्हटले आहे. अकोले आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबईचे प्रांताध्यक्ष
अकोले ःअसल्याचे आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे उपाध्यक्ष सी.बी.भांगरे यांनी म्हटले आहे. अकोले आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबईचे प्रांताध्यक्ष रामनाथ भोजने यांना निसर्ग पर्यावरण महामंडळ संस्थेचा सन 2024 या वर्षाचा वृक्षमित्र हा पुरस्कार मिळाला आहे. त्याचे वितरण नुकतेच राळेगणसिद्धी येथे समाजसेवक अण्णा हजारे याच्या हस्ते व प्रमोद दादा मोरे आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
भोजने हे नोकरी निमित्त मुंबई येथे कार्यरत होते पण त्यांची नाळ आपल्या गावाशी कायमच जुळलेली आहे. आपल्या गावाचे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने ते सतत कार्यरत असतात. ज्यांच्या सततच्या धडपडीमुळे त्यांनी आपल्या आबिटखिंड गावात, कळसूबाई परिसर या ठिकाणी वक्ष लागवड व संवर्धन या माध्यमातून भरीव कामगिरी केली म्हणूनच त्यांना वक्षमित्र हा पुरस्कार मिळाला. भोजने हे राजकीय,शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून ते सतत सामाजिक संघटन, वधुवर मेळावे, प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते गावपातळीवर एसटीची वाहतूक सुरू करणे, बोगस व घुसखोरी याबाबत समाज जागती करणे इ. बाबतीत त्यांचे मोठे काम आहे विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते मुंबई स्थित समाज बांधवांचे संघटन करत आहेत. आदिवासी संघर्ष योद्धा, महान क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांचा सम्तीदिन 2 मे रोजी ठाणे येथील कारागृहात मधुकरराव पिचड माजी आदिवासी विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असतो त्या कार्यक्रमास राज्यातून अनेक मान्यवर आदिवासी बांधव येत असतात त्या कार्यक्रमाचे नियोजन ते अत्यंत यशस्वीपणे पार पाडतात. त्यांना वक्षमित्र पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा यथोचित सन्मान झाला आहे. त्यांच्या या सन्मानाने अकोले तालुक्याचा सन्मान वाढला आहे त्यांचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकरराव पिचड युवानेते वैभवराव पिचड, आदिवासी उन्नत्ती मंडळाचे सचिव, मंगलदास भवारी उपाध्यक्ष, सी.बी.भांगरे यांनी रामनाथ भोजने यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS