Homeताज्या बातम्यासंपादकीय

मुंबईची दैना आणि उपाययोजना  

मुृंबई शहर कधीच कोणत्याही संकटामुळे थांबत नाही. कोणतीही आपत्ती आली तरी, मुंबई दुसर्‍या क्षणाला धावत असते. मात्र मुंबईतील पाऊस मात्र मुंबईकरांचे स

दाभोळकर हत्या तपास आणि न्याय
तिच्या सुरक्षेचे काय ?
अर्थव्यवस्थेच्या नाड्या आणि हिंडनबर्ग

मुृंबई शहर कधीच कोणत्याही संकटामुळे थांबत नाही. कोणतीही आपत्ती आली तरी, मुंबई दुसर्‍या क्षणाला धावत असते. मात्र मुंबईतील पाऊस मात्र मुंबईकरांचे स्पिरीटला वेसण घालतांना दिसून येत आहे. कारण विक्रमी पावसानंतर रेल्वेची चाके थांबतांना दिसून येत आहे. घराबाहेर पडण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही, आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा या पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. त्यामुळे आपल्याकडील आपत्ती व्यवस्थापनाचे कसे तीनतेरा वाजतात, त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. नालेसफाईचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येतांना दिसून येत आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये विक्रमी 300 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर किती दयनीय अवस्था झाली, त्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. जर कदाचित हवामान बदल आणि पर्यावरणीय बदलामुळे भविष्यात मुंबईमध्ये 500 मिलिमीटर पाऊस पडल्यास या शहराची काय अवस्था होईल ते सांगता येत नाही. दरवर्षी पाऊस सुरू झाला की, मुंबईकरांच्या पोटात गोळा उठतो. मुंबईतील पाऊस लवकर थांबत नाही, शिवाय वाढत्या प्रदुषणामुळे मुंबईमध्ये पाऊस अवेळी पडतांना दिसून येतो. पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वे, पश्‍चिम रेल्वे व हार्बर लाईन्स् ठप्प होतात आणि मुंबई क्षणात थांबते. शिवाय राज्याचे प्रमुख म्हणून सरकारकडून देखील हातवर केल्याखेरीज कोणत्याही उपाययोजना करण्याचे धाडस दाखवण्यात येत नाही. वास्तविक पाहता मुंबई शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे. या शहरामध्ये ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात येणार्‍यांची संख्या मोठी आहे.

बिहार, उत्तरप्रदेशातून येणार्‍या कामगारांचे लोंढे देखील मोठे आहे. त्यामुळे मुंबईमध्ये इतकी मोठी लोकसंख्या हे शहर सामावून घेत आहे. या शहराला शिस्तबद्ध कोणतेच नियम नसल्यासारखे हे शहर वाढतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता एक सुसज्ज आणि नियोजनबद्धरित्या तयार केलेले शहर म्हणून या शहराची रचना करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता अवकाळी किंवा विक्रमी पॉस पडण्याचे मुख्य कारण म्हणजे हवामान बदलाचा फटका होय. जगातील तापमान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडण्याच्या समस्या देखील भेडसावतांना दिसून येत आहे. समुद्राची पातळी वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे किनारी भागामध्ये पूर आणि जमिनीची धूप या समस्या वाढीस लागतील. याचासंबंध गेल्या पाच ते 10 वर्षांमध्यल्या काही घटनांशी लावणे अत्यावश्यक बनतांना दिूसन ेयत आहे. कारण काही वर्षांपूर्वी कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई सारख्या शहरात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली होती. किनारी शहरांमध्ये पूराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे हवामान बदल होय. यासोबतच मुंबई महापालिकेकडून कोट्यावधींचा खर्च नालेसफाईसाठी करण्यात येत असला तरी, तो पैसा कुणाच्या घशात जातो माहित नाही, मात्र त्यातून योग्यरित्या नालेसफाई होत नाही. यासोबतच मुंबई शहर सात बेटं एकमेकांना जोडून तयार केलेले शहर आहे. त्यामुळे या शहराची भौगोलिक परिस्थिती पूर येण्यासाठी अनुकूल आहे. यासोबतच महत्वाचे कारण म्हणजे मुंबई शहराला तीनही बाजूने समुद्र आणि खाडीचा वेढा आहे. त्यामुळे यामध्ये दलदलीच्या प्रदेशामुळे खारफुटी जंगलामुळे मुंबईचा किनारा सुरक्षित राहतो. मात्र या किनारा क्षेत्रात अलीकडच्या काही क्षेत्रात मानवाचे अतिक्रमण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुराचा धोका वाढतांना दिसून येत आहे. खारफुटीचे जंगल आणि मिठागारं वाचवण्याची गरज आहे. तरच मुंबईवरील अतिवृष्टीचा धोका टळेल. मात्र विकासाच्या नावावर आपण प्रचंड प्रमाणात अतिक्रमण करतांना दिसून येत आहे. ते मानवाच्या भविष्यासाठी धोकादायक ठरतांना दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईच्या पुढील भविष्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कठोर उपाययोजना करण्याची खरी गरज आहे.

COMMENTS