टाळेबंदीच्या आदेशात संदिग्धता  ; औद्योगिक क्षेत्राबाबत उल्लेख नसल्याने गोंधळ कायम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाळेबंदीच्या आदेशात संदिग्धता ; औद्योगिक क्षेत्राबाबत उल्लेख नसल्याने गोंधळ कायम

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यात संदिग्धता असल्याची प्रतिक्रिया औद्योगिक सह विविध क्षेत्रातून येत आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल
माज जिरवण्यासाठी आमची व लोकमंथनची ख्याती !
आयफोन खरेदीच्या नावाने 5 लाखाचा गंडा

पुणे/प्रतिनिधी : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यात संदिग्धता असल्याची प्रतिक्रिया औद्योगिक सह विविध क्षेत्रातून येत आहे. तसेच टाळेबंदी निर्बंधाबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर होणे देखील गरजेचे आहे. टाळेबंदीच्या निर्णयावर सविस्तर आदेश जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार स्पष्ट आदेश देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिली आहे. 

राज्य सरकारने पंधरा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यात संदिग्धता असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयएने) वेबिनार आयोजित केला होता. त्यात विभागीय आयुक्त राव बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे, अविनाश हदगल, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते. राव म्हणाले, की उद्योगांवर उगाचच कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. कोरोना नियमांचे पालन केल्यास बाधितांचा आकडा निश्‍चितच खाली येईल; मात्र ते आपण किती निर्बंध पाळतो त्यावर अवलंबून आहे. निर्बंध पाळले न गेल्यास नाईलाजाने टाळेबंदीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने आपल्या घराचा उंबरठा केव्हाच ओलांडला आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे प्रामाणिकपणे पालन करावे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा अबाधित राहतील. तसेच त्यांना पुरवठा करणारी उत्पादन साखळी सुरळीत राहील. गेल्या वर्षीच्या टाळेबंदी मार्गदर्शक सूचनेत निर्यात केल्या जाणार्‍या उत्पादनांचा समावेश नव्हता. निर्यात केले जाणारे उद्योग सुरू राहील, याची काळजी घेतली जाईल. तसेच जीवनावश्यक वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग आणि त्यांची उत्पादन साखळी अबाधित राहील. कोरोना नियमांचे पालन करून कामावर येणार्‍या कोणत्याही कामगारांची आणि पुरवठादारांची अडवणूक होणार नाही. औषध, शेतमाल आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग, डेअरी, फोर्जिंग, स्टील, पेंट उद्योग सुरू राहतील. तसेच त्यांना पुरवठा करणारी पुरवठा करणारी उत्पादन साखळी अबाधित राहील. निर्यातक्षम उद्योग सुरू राहतील, असेही राव यांनी या वेळी स्पष्ट केले. पुण्यामध्ये ऑटो उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, त्यांचे निर्यातीचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे हा उद्योग सुरू राहील. कामगारांना कामावर येण्यासाठी अडचण येणार नाही. त्यांचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल, असे उद्योग सहसंचालक सुरवसे म्हणाले. टाळेबंदी निर्बंधाबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर व्हावा. नियमांचे पालन करणे सोयीचे जावे, यासाठी संभ्रम दूर करण्याचे आवाहन मेहता यांनी केले, तर पुण्यातून दरमहा पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा माल निर्यात होतो याकडे गिरबने यांनी लक्ष वेधले. सुधीर मेहता म्हणाले, की बर्‍याच इंडस्ट्रीजवर परिणाम होईल अशी चिन्हे आहेत. आत्ता फक्त शेतीमालावर प्रक्रिया करणार्‍या तसेच डेअरी इंडस्ट्री आणि कन्ट्यिन्यू प्रोसेस इंडस्ट्रीला परवानगी आहे असे म्हटलेेले आहे. अर्थात आम्ही अजून पूर्ण नियमावली यायची वाट पाहत आहोत.

COMMENTS