Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामावर न आल्याने शेतमजुराची हत्या

पुणे : कामावर न आल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने शेतमजुरीची धारदार कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना खडकवासला धरण परिसरातील मांडव

भाजप नेते पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी
मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते, म्हणून तरुणाचा खून l
नाशिक – औरंगाबाद मार्गावर खाजगी बसचा मोठा अपघात

पुणे : कामावर न आल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने शेतमजुरीची धारदार कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना खडकवासला धरण परिसरातील मांडवी बुद्रुक येथे घडली आहे. कहर म्हणजे मृत व्यक्तीची पत्नी आपल्या नवर्‍याला रुग्णालयात घेऊन जात असताना आरोपीने आपल्या कारने तिला धडक मारली. त्यात सदर महिलाही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भरत लक्ष्मण वाल्हेकर (वय 55, सध्या रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. रोहा, जि. रायगड) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी आरोपी संजय हिंदुराव पायगुडे (वय 50, रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सचिन नथू पायगुडे (वय 45) या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास दिनकर पायगुडे यांच्या शेतात वाल्हेकर दाम्पत्य कामाला होते. पायगुडे यांच्या खोलीत ते भाड्याने राहत होते. आरोपी सचिन हा विलास पायगुडेचा पुतण्या आहे. वाल्हेकर दाम्पत्य मूळचे रायगड जिल्ह्यातील रोहा गावचे रहिवासी आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते संबधित ठिकाणी वास्तव्यास आहेत. वा्ल्हेकर गावातील अन्य शेतकर्‍यांकडे काम करत होते. पायगुडे यांच्या शेतावर ते चार दिवस कामाला आले नव्हते. ते दुसर्‍या एका शेतकर्‍याकडे कामाला जात होते. आरोपी सचिनने वाल्हेकरने त्यावेळी दाम्पत्याशी जोरदार वाद घालण्यास सुुरुवात केली. सचिनने भरत वाल्हेकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्याने भरत यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार केला. त्यावेळी भरत यांची पत्नी अनुसयाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोयत्याच्या दांड्याने अनुसया यांना देखील मारहाण करण्यात आली. या घटनेत भरत गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या भरत यांना घेऊन त्यांची पत्नी अनुसया रुग्णालयात उपचारासाठी घेऊन निघाली होती. त्यावेळी आरोपी सचिन कार मधून आला. त्याच्याबरोबर आरोपी संजय पायगुडे होता. कारचालक आरोपी सचिनने वाल्हेकर दाम्पत्याला भीषण धडक दिली. ग्रामस्थांनी जखमी अवस्थेतील वाल्हेकर दाम्पत्याला ससून रुग्णालयात दाखल केले.मात्र, उपचारांपूर्वीच भरत यांचा मृत्यू झाला. भरत यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला होता. ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी या घटनेची माहिती हवेली पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी अनुसया यांचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी संजय पायगुडेला अटक करण्यात आली असून, साथीदार सचिनचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार पुढील तपास करत आहेत.

COMMENTS