Homeताज्या बातम्यासंपादकीय

हिट अँड रनच्या वाढत्या घटना चिंताजनक

अलीकडच्या काही दिवसांमध्ये सातत्याने हिट अँड रनच्या घटना घडतांना दिसून येत आहे. पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेनंतर, नागपूर, वरळी, बीड, आणि सोमवारी

राजकारणात आणखी एक गांधी
तापमानवाढीचा उच्चांक
महाराष्ट्रात दिवाळीनंतरच निवडणूक !

अलीकडच्या काही दिवसांमध्ये सातत्याने हिट अँड रनच्या घटना घडतांना दिसून येत आहे. पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेनंतर, नागपूर, वरळी, बीड, आणि सोमवारी मध्यरात्री जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एका भरधाव कारने 2 पोलिसांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. वाहतूक पोलिसालाच चिरडण्याचा प्रयत्न या सर्व घटना पाहता महाराष्ट्राची वाटचाल स्पष्टपणे दिसून येत आहे. यासंदर्भात महत्वाची बाब म्हणजे वाहतुकीचे नियम पाळण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील घटनेने अधोरेखित केले की, अल्पवयीन मुलाच्या हातात महागडी पोेर्शे कार देण्याचा प्रताप उघडकीस आला होता. सोबत चालक असतांना देखील केवळ ड्रग्ज आणि मद्य प्राशन केल्यानंतर मुलाने गाडी चालवण्याचा केलेला आग्रह आणि ड्रायव्हरने देखील त्याचा पुरवलेला लाड यामुळे दोघांचा हकनाक जीव गेला होता. तोच कित्ता वरळीमध्ये देखील घडल्याचे समोर आले आहे. पालघरमधील शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने दोघांना चिरडले. त्यापूर्वी त्याने पबमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन केले होते. शिंदे गटाच्या नेत्याचा मुलगा मिहीर शाहने वरळीमध्ये दुचाकीवरील दाम्पत्याला आपल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली होती. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेच्या एका दिवसानंतर आरोपी मुलाचा पबमधून बाहेर पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

अपघातापूर्वीचे हे फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये मिहिर शाह आपल्या मित्रांसोबत मुंबईतील एका पबमधून बाहेर पडताना दिसत आहे. पबमधून बाहेर पडताना ते मर्सिडीजमध्ये दिसले. त्यानंतर कार बदलत त्याने बीएमडब्ल्यू कार चालवत असतांना हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर मदत करण्याचे तर दूरच मात्र त्या महिलेला फरफटत नेण्याची गुर्मी या बालकाने देखील दाखवली. त्यामुळे हिट अ‍ॅड रनच्या घटना हा वाढत आहे, यामागची कारणमिमांसा तपासण्याची वेळ आली आहे. त्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यावर उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. हातात चारचाकी आली म्हणजे, आपण जगातला वेगळा प्राणी आहे, असा भास तरूण पिढीला होतांना दिसून येत आहे. त्यात बहुतांश प्रकरणात चारचाकी चालवण्यापूर्वी अनेकांनी मद्य प्राशन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आळा घालण्याची खरी गरज आहे. त्याचबरोबर आजच्या पिढीला घरातून संस्काराची शिदोरी कमी पडतांना दिसून येत आहे. त्यामुळेच रस्त्यावर वावरतांना ते बेदारकपणे गाडी चालवतांना दिसून येत आहे. त्यामुळे अलीकडच्या तरूणांमधील संस्कार तपासण्याची वेळ आलेली आहे. आपण कुठेतरी चुकतो आहोत, याचा शोध घेण्याची गरज आहे.

खरंतर मुलांना हवे त्या गोष्टी आपण वेळेआधीच देतो. त्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीची कधीच गरज भासत नाही. शिवाय घरातील बडे प्रस्थ, त्यामुळे दिमतीला नोकर-चाकर असतात, आणि त्या वरिष्ठांकडून तो बाब्या हवे ते कामे करून घेतात. वास्तविक घरातूनच या मुलांना संस्कार शिकवण्याची गरज आहे. जर घरातील नोकरांसोबत आदबीने वागण्याची, त्यांना काका, मामा बोलून ते देखील आपल्याच घरातील एक सदस्य आहे, या नात्याने जर वागवले, तर मुलांना देखील चांगल्या पद्धतीचे संस्कार होतात. मात्र बापच घरातील नोकरांना, तसेच बाहेरच्यांना शिव्या देणे, ओरडणे, यासारखे प्रकार मुलांसमोर करत असेल तर, मुलगा देखील बापाचे तेच गुण आत्मसात करतो, आणि त्यातूनच अशा घटना घडतात. वास्तविक पाहता पोर्शे कार अपघात प्रकरणात आजोबा, वडील, नातू आणि आई असे चार व्यक्तींना तुरूंगात जावे लागले. अर्थात ते कर्माचे फळे आहेत. मात्र याप्रकरणी उपाययोजना करण्याची खरी गरज आहे, अन्यथा अपघातांची संख्या ही अशीच वाढू शकते. 

COMMENTS