Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाचा नाकर्तेपणा, आठ महिन्यांपासून उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

कोपरगाव तालुका ः पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2017 मार्फत 29 नोव्हेंबर 2023 रोजी शिक्षक भरतीतील अपात्र, गैरहजर या पदांची यादी राज्य सरकारने लावली. मात्र

विकासाच्या बाबतीत दक्षिण भागावर कायमच अन्याय – अ‍ॅड.प्रताप ढाकणे
32 कोटींचा तो विषय ठेवला राखून, स्मशानभूमीचा नवा प्रस्ताव आणणार
तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, २१ जून २०२१ l पहा LokNews24

कोपरगाव तालुका ः पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2017 मार्फत 29 नोव्हेंबर 2023 रोजी शिक्षक भरतीतील अपात्र, गैरहजर या पदांची यादी राज्य सरकारने लावली. मात्र पुढील 4-5 दिवसात उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे या यादीवर काही उमेदवारांना स्थगिती घेण्यात यश मिळाले. त्यानंतर आठ महिने उलटून गेले तरी, अजून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळेना. शासनाच्या उदासीनतेमुळे 332 उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत व नियुक्ती नसल्यामुळे मानसिक ताण-तणावातून जात आहेत.
         2022 च्या शिक्षक भरतीमध्ये मात्र न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यानंतर शासनाने आपले सर्व कसब पणाला लावून न्यायालयीन लढा दिला. अगदी राज्याच्या महाधिवक्त्यांना सुनावणीसाठी हजर करून कुठल्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही. मात्र 2017 च्या भरतीबाबत मात्र शासनाची तीव्र उदासीनता दिसून येत आहे. 2017 शिक्षण अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी अर्थात टीएआयटी परीक्षेच्या या यादीनंतर टीएआयटी 2022 परीक्षेच्या दोन याद्या लागल्या आहेत. त्यातील उमेदवार रुजू देखील झाले. दुर्दैवाने जून्या भरतीतील उमेदवार अजून सुद्धा नियुक्ती मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. मुंबई येथे 2 जुलै रोजी आंदोलन करून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचेसोबत चर्चा देखील केली होती. या स्थगिती विरोधात राज्याचे महाधिवक्त्यांना हजर करू असे आश्‍वासन दिले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेला हा संघर्ष कधी संपणार हे देवच जाणे. निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने उमेदवार प्रचंड नैराश्याच्या गर्तेत गेल्याचे दिसून येत आहे. शासनाने लवकरात लवकर स्थगिती उठवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे उमेदवार बोलू लागले आहेत.

COMMENTS