Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरळी, बीडमध्ये ‘हिट अँड रन’च्या घटना

पोलिस उपनिरीक्षकाचा आणि एका महिलेचा मृत्यू

मुंबई/बीड ः राज्यात हिट अ‍ॅड रन घटनांचे सत्र अजूनही काही थांबण्याची चिन्हे नाहीत. पुणे, नागपूरनंतर रविवारी पुन्हा एकदा बीड आणि वरळीमध्ये हिट अ‍ॅड

राजधानीत हिट अ‍ॅण्ड रनच्या घटनेत एकाचा मृत्यू
मुंबईत पुन्हा हिट अ‍ॅण्ड रन
पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार

मुंबई/बीड ः राज्यात हिट अ‍ॅड रन घटनांचे सत्र अजूनही काही थांबण्याची चिन्हे नाहीत. पुणे, नागपूरनंतर रविवारी पुन्हा एकदा बीड आणि वरळीमध्ये हिट अ‍ॅड रनच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बीडमधील घटनेत एका पोलिस उपनिरीक्षकाचा तर वरळीतील घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने आपल्या भरधाव महागड्या बीएमडब्ल्यू कारने वरळीत एका महिलेला चिरडले आणि तिथून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याला ताब्यात घेतले आहे. तर त्याचा मुलगा फरार मिहीर शहा याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
बीडमध्येही एक हिट अँड रनची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलिस उपनिरीक्षकालाच परीक्षेच्या बंदोबस्तसाठी जाताना भरधाव वेगाने येणार्‍या कारने उडवले आहे. यामध्ये या पोलिस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र नन्नवरे असे त्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील नेकनूरच्या जवळ हा अपघात झाला आहे. नेकनूर पासून जवळच असलेल्या नन्नवरे वस्तीतून पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी नन्नवरे जात होते. मात्र नेकनूर-मांजरसुंबा रस्त्यावर नेकनूर पासून जवळच कालिका मंगल कार्यालयासमोर नेकनूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे समोरच्या दिशेने येत असलेल्या या गाडीने समोरून धडक दिल्याने नन्नवरे खाली पडले. तसेच कारही पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
तर दुसर्‍या घटनेत मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अ‍ॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली. अ‍ॅट्रिया मॉलजवळच असणार्‍या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला शिंदे गटाच्या उपनेत्याच्या बीएमडब्ल्यू गाडीने धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवर्‍याचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवर्‍याने प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आले नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकाने गाडी पळवली. त्यात त्याने बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेले. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केले.

कुणालाही अभय देणार नाही ः मुख्यमंत्री शिंदे – याबाबत शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

COMMENTS