Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोजमध्ये निषेध

ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघाकडून आरोपींच्या अटकेची मागणी

निघोज ः निघोज येथील जत्रा हॉटेलवर मंगळवारी झालेल्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन व पत्रकार संघ, तसेच विविध सामाजिक संघटना यांनी ती

भाजपच्या नव्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सत्कार
नगर -पाथर्डी येथे चोऱ्या केलेला चोरास मिरजगाव येथे अटक
कोल्हे साखर कारखान्याचे वतीने साखर आयुक्तांचा सत्कार

निघोज ः निघोज येथील जत्रा हॉटेलवर मंगळवारी झालेल्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन व पत्रकार संघ, तसेच विविध सामाजिक संघटना यांनी तीव्र निषेध केला. गुरुवार 4 जुलै रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यवसायीकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला. यावेळी सकाळी नउ वाजता या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच दोन दिवसात पोलीसांनी आरोपींना अटक न केल्यास एस टी बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तसेच सराईत गुन्हेगार धोंड्या जाधव याला तसेच त्याच्या गुन्हेगार साथीदारांना मोक्का लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच मंगळवार 9 जुलै रोजी होणार्‍या ग्रामसभेत मोक्का ठराव घेण्यात येणार असून पारनेर व नगर पोलिसांनी यामध्ये हलगर्जीपणा केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करुन आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.  निघोज आणी परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत यामध्ये मटका, जुगार, अवैध दारू हे धंदे मोठ्या प्रमाणात आहेत.  अवैध धंदे बंद न झाल्यास याचा पाठपुरावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांच्या कडे तक्रार करुण हे धंदे बंद न झाल्यास पुन्हा एकदा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला. धोंड्या जाधव हा सराईत गुन्हेगार आहे याची माहिती पुणे व नगर पोलीसांना माहिती आहे. मात्र स्थानिक पोलीस मात्र अशा गुन्हेगारांना पाठीशी घालतात, राजरोसपणे हा गुन्हेगार निघोज, टाकळी हाजी ता. शिरुर परिसरात फिरुण दहशत निर्माण करुण सर्वसामान्य व्यवसायीकांकडून खंडणी म्हणजे हप्ता घेतो आणी यातून जत्रा या हॉटेलवर दहशत निर्माण करुन हल्ला करुन मालक व कर्मचारी यांना गंभीर जखमी करुण दहशत निर्माण केली.

जेणेकरून भुकन यांनी हप्ता सुरू केल्यास ईतर ठिकाणचे हप्ते सुरू होतील हा आरोपींचा उद्देश होता असे आजच्या निषेध सभेतील ग्रामस्थांच्या चर्चेवरून जाणवले. याचाच अर्थ एखाद्या हॉटेलवर मारहाणीचा प्रकार करुन दहशत निर्माण केल्यास ईतर हॉटेल मालक न मागता पैसे देतील हा उद्देश गुन्हेगारांचा असल्याने जत्रा हे हॉटेल निवडले शिवाय हे हॉटेल रात्री 11 वाजता बंद होत असल्याने बरोबर त्याच वेळेची निवड केली जेणेकरून भुकन व त्यांच्या सहकार्‍यांना मारहाण करताना कुणी मध्ये येणार नाही. हल्लेखोरांकडे कोयते,तलवारी, दंडुके अशी हत्यारे होती याचाच अर्थ हा हल्ला पुर्वनियोजीत कट होता. या हल्ल्याचा निषेध करुण ग्रामस्थांनी गावातून मुक मोर्चा काढला तसेच मळगंगा मंदीरासमोरील जाहीर निषेध सभेत पोलीसांना निवेदन दिले. यावेळी माजी सरपंच ठकाराम लंके, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण, माजी उपसभापती खंडू भुकन, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे आदिंनी आपल्या भावना व्यक्त करीत पोलीसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत व्यापारी असोसिएशन सदस्यांनी या खंडणीखोरांना थारा न देता कोनतीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा आम्ही आमच्या पद्धतीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना संपर्क करुण या अट्टल गुन्हेगारांचा पर्दाफाश करु असे आश्‍वासन दिले. बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, चंद्रकांत लामखडे, अमृताशेठ रसाळ, बाजार बबुशा वरखडे, रामदास वरखडे, शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्‍वर कवाद, अंकूश लोखंडे, वसंत ढवण, बाळासाहेब रसाळ, ग्रामपंचायत योगेश वाव्हळ, महेश लोळगे, मयुर गुगळे, भिवाशेठ रसाळ, बाबाजी कळसकर, विश्‍वास शेटे मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील,पारनेर तालुका पत्रकार भास्कर कवाद, न आनंद भुकन व योगेश खाडे, जयसिंग हरेल, सागर आतकर, रवि रणसिंग आदी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS