Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभ्यासक्रमात कथा समाविष्टबद्दल डॉ. उपाध्ये यांचा सत्कार

श्रीरामपूर ः येथील साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल सराला बेटाचे मठाधिपती प.पू. रामगिरीजी महाराज यांच्या

छ. संभाजीराजांचे शौर्य शत्रुला धडकी भरवणारे
LOK News 24 I दखल*—————*रेखा जरे हत्याकांडाचा नगरच्या हनीट्रॅपशी संबंध ? l पहा LokNews24*
पारवा पकडण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू

श्रीरामपूर ः येथील साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल सराला बेटाचे मठाधिपती प.पू. रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
 माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील यांच्यातर्फे सरला बेट येथे भक्तांसाठी पंक्तीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, भागवतराव मुठे, डॉ. उपाध्ये, आरोग्यमित्र भीमराज बागूल यांनी रामगिरी महाराज यांचे संतपूजन केले. डॉ. उपाध्ये यांनी आपली नवी पुस्तके रामगिरीजी महाराज, मधुकर महाराज व उपस्थित भक्तगणांना भेट दिले, त्याप्रसंगी डॉ. उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. रामगिरीजी महाराजांनी आनंद व्यक्त करीत डॉ. उपाध्ये यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला. मधुकर महाराज म्हणाले, डॉ. उपाध्ये यांचे लेखन वाचनीय आहे, त्यांनी वाचण्यास भरपूर पुस्तके दिली. आमचे भक्तगण आणि मुले यांना छान पुस्तके मिळाली. आम्हाला वाचण्यास संधी दिली पण वेळ मिळाला पाहिजे. डॉ. उपाध्ये यांनी सराला बेटाच्या पवित्र कार्यावर लेखन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रामगिरीजी महाराज यांनी पुस्तके पाहून आनंद व्यक्त करीत पुढील लेखनास आशीर्वाद दिले. यावेळी भागवतराव मुठे, प्राचार्य शंकरराव गागरे, भीमराज बागूल यांचेही नारळ, भेटवस्तू देऊन महाराजांनी सत्कार केले. यावेळी खैरी निमगावचे विजयराव गायकवाड,अक्षय गायकवाड,अक्षता गायकवाड आणि मोठ्या संख्येने  भक्तगण उपस्थित होते.

COMMENTS