Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय हिंद फाउंडेशनने पाथर्डी तालुक्यात लावली सर्वाधिक वडाची झाडे

अहमदनगर ः वृक्षरोपण व संवर्धन चळवळीत सातत्याने कार्यरत असलेल्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी वडाची झाडे लाऊन त्याचे

महिलांना लेखन कलेत अनेक संधी- डॉ.ऋचा शर्मा
वसुंधरेचे संरक्षण नागरिकांचे कर्तव्य : डॉ. सिद्दिकी
अण्णा हजारेंनी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान ऊर्जादायी ः विद्या पवळे

अहमदनगर ः वृक्षरोपण व संवर्धन चळवळीत सातत्याने कार्यरत असलेल्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी वडाची झाडे लाऊन त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. कोल्हार सर्वाधिक वडाचे झाड असलेले गाव म्हणून पुढे आले आहे. मागील चार वर्षात लावण्यात आलेली मोठ्या प्रमाणात जगविण्यात आली असून, ती झाडे चांगली बहरली असल्याची माहिती फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांनी दिली.
कोल्हार येथे जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. कोल्हुबाई माता गड येथील महादेव मंदिर परिसरात 500 वडाच्या झाडाची भगवान शंकराची पिंड साकारण्यात आली आहे. कोल्हार घाट ते कोल्हुबाई माता गड येथे 120 वडाची झाडे लावण्यात आली आहे. कोल्हुबाई माता प्रवेशद्वार ते गावातील रस्त्यावर फुल झाडे लावण्यात आली आहे. देवीच्या गड परिसरात 1 हजार राणटी फळझाडे गावातील दिवंगत व्यक्तींच्या नावाने लावण्यात आली आहे. कोल्हार येथे एकुण 620 झाडे फुलविण्यात आली आहे. गावातील वनराईमुळे निसर्ग बहरला असून, ऑक्सीजनचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच झाडांमुळे पावसाचे प्रमाण वाढणार असून, पर्यावरणाचा प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार आहे. नटलेल्या हिरवाईने कोल्हुबाई माता गड व महादेव मंदिर परिसर पर्यटन केंद्र म्हणून पुढे येणार आहे. त्यामुळे गावच्या उत्पन्नात देखील वाढ होईल व गावातील जनसामान्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोल्हार हे भारतातील सर्वाधिक वटवृक्ष असलेले गाव म्हणून देशाच्या नकाश्यावर आणण्याचा मानस मानस शिवाजी पालवे यांनी व्यक्त केला. वडांच्या झाडांची लागवड व संवर्धनासाठी जेष्ठ मागदर्शक महादेव पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, सामाजिक कार्यकर्ते गौरव गर्जे, सरपंच बाबाजी पालवे, शंकर डमाळे, किशोर पालवे, बाळासाहेब पालवे, मदन पालवे, ईश्‍वर पालवे, संदिप पालवे, अ‍ॅड. पोपट पालवे, संदीप जावळे, जय हिंद वृक्ष बँकचे शिवाजी गर्जे, रोहीदास पालवे, भाऊसाहेब पालवे, अनिल गर्जे, भाऊसाहेब डमाळे, विजय पालवे, जांबुवंत पालवे, देवीदास गिते, नामदेव जावळे गुरुजी, करण जावळे, अरुण गिते, सुभेदार अशोक गर्जे, कैलास पालवे, पै. अक्षय डमाळे, मिठू पालवे, धनाजी गर्जे, अभिजीत पालवे, सोपान पालवे, अप्पा गर्जे, प्रा. प्रेमकुमार पालवे, अशोक गर्जे, शर्मा पालवे, शंकर डमाळे, कारभारी गर्जे, संतोष पालवे, सोमा मिसाळ, आजिनाथ पालवे, रमेश जावळे, एकनाथ पालवे, संजय पालवे, राहुल पालवे, दिनकर पालवे, नवनाथ पालवे, विठ्ठल मिसाळ, अ‍ॅड. प्रवीण पालवे, आजिनाथ पालवे आदींनी परिश्रम घेतले.  

COMMENTS