Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंजनापूरच्या वृक्षप्रेमींचे कार्य प्रेरणादायी ः माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागातील अंजनापुर या गावाने गेल्या दहा वर्षापासून हजारो वृक्ष आज पर्यंत लावून, त्याला लोखंडी जाळीचे

कोपरगावकर गढूळ पाण्याने त्रस्त ः मंगेश पाटील
कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा – मंगेश पाटील
बचतीच्या पैशातून विद्यार्थ्यांकडून दिलेले गणवेश कौतुकास्पद ः मंगेश पाटील

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागातील अंजनापुर या गावाने गेल्या दहा वर्षापासून हजारो वृक्ष आज पर्यंत लावून, त्याला लोखंडी जाळीचे ग्रील करून त्यावर ते झाड लावण्याची तारीख याचा फलक लावून ते वर्षभर टँकरने पाणी देऊन जोपासण्याची एक महान आदर्शवत कार्य अंजनापूरचे लक्षवेध फाउंडेशन च्या वतीने अविरत चालू आहे ते इतर गावांना प्रेरणादायी असल्याचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी सांगितले. या वृक्षप्रेमी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे गणपती उत्सवाच्या काळात चाकरमाने लोक व कोकणातले लोक हे मुंबईहून आपापल्या गावी जाऊन हा उत्सव दरवर्षी अविरतपणे करतात सहभागी होतात. त्याच पद्धतीने या गावातून बाहेरगावी गेलेले तरुण वर्ग, माणसे, महिला भगिनी हे दरवर्षी जुलै महिन्यात 6, 7, 8, 9 या तारखेला आपल्या गावात येऊन वृक्षारोपणाचे कार्य करतात व परत आपापल्या नोकरीच्या ठिकाणी जातात व  गावात राहणारी मुले नागरिक ही झाड जोपासण्याचे अविरत काम चालू ठेवतात.
    यावर्षी सर्वांना उन्हाळ्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवली आणि वृक्ष लावणे व त्याचे संवर्धन करणे वाढवणे याचे महत्त्व संपूर्ण जगालाच कळालं. वृक्ष राहिली नाही तर येणार्‍या काळात जीवसृष्टी नष्ट होईल अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे प्रत्येकाने या पावसाळ्यापासून वाढदिवस असू किंवा दुसरं कुठलं कार्य असो त्याचं स्मरण म्हणून झाड लावून ते वाढवणे चे काम हे प्रत्येक नागरिकांनी अंजनापूरचा आदर्श घेऊन करावे. यावर्षी या चार दिवसात अंजनापुर वासीय 1008 झाडे लावणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील, शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी, शाळांनी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या गावाला व परिसरातील भागाला भेट देऊन वृक्ष संवर्धन व वृक्ष कसे वाढवले व कसं गाव हिरवं गार केलं हे बघायला जावे. मोठमोठ्या महान व्यक्तींनी या गावाला आजपर्यंत वेळोवेळी भेटी देऊन त्यांचं कौतुक केलेल आहे यात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, हिरवे बाजारचे पोपटराव पवार, स्नेहालयचे डॉ.गिरीष कुलकर्णी, परदेशातील ऑलिव्हर ग्रीव्हबर्ग, गुजरातमधील वेगवेगळे मोठे उद्योजक , शासनाचे प्रतिनिधी अधिकारी अशा अनेक मान्यवरांनी या वृक्षारोपणाच्या काळात भेटी देऊन आपला सहभाग नोंदवत अभिनंदन केले. या गावाला भेट देऊन वृक्ष बघितले .त्यांची कामाची पद्धत बघितली खूप आनंद झाला. कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता या गावचे वृक्ष प्रेमींचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यातील जे काही सर्व ग्रामस्थ आहे व जे मंडळी पुढाकार घेऊन करतात, त्यांनी कधीच कोणाचे नाव सांगितले नाही, ते फक्त म्हणतात आम्ही सर्व मिळून हे करतो. गेल्या दहा वर्षा वर्षात यांनी 14000 झाडे आजपर्यंत लावून ती मोठे केलेत.अशा ह्या आदर्शवत अंजनापूर गावाला सर्वांनी भेट द्यावी व आपापल्या परीने हे कार्य वृक्षारोपणाचे वाढवावं जेणेकरून कोपरगाव तालुका तालुका हिरवागार होऊन पावसाचे प्रमाणही वाढेल व उन्हाळ्याची तीव्रता जाणवणार नाही व पूर्वीप्रमाणे कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाईल. त्यांच्या या 2014 सालापासून कामत शाळेतील छोटे छोटे मुलं मुली, शेजारच्या गावातील वृक्षप्रेमी ही उत्सवाप्रमाणे सहभागी होऊन आनंदमय वातावरणात एकत्रपणे हे काम करतात. कुठल्याही प्रकारच्या मानाची व नावाची अपेक्षा न ठेवता अविरतपणे हे काम या कोपरगाव तालुक्यातील जनापूरचे गावचे, वृक्ष प्रेमींचे चालू आहे.

COMMENTS