Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोकुळचे दूध मुंबई, पुण्यात महागले

दुधात प्रति लिटर दोन रूपयांची वाढ

मुंबई : राज्यभरात दूधाचे दर 40 रूपये करण्यासाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून आंदोलन करण्यात येत असतांना, दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ

शरद पवार गटाचे पुरावे गायब
प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया
दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच

मुंबई : राज्यभरात दूधाचे दर 40 रूपये करण्यासाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून आंदोलन करण्यात येत असतांना, दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनेही दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या दूधात प्रति लिटर 2 रूपये भाव वाढ करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे. हा भाववाढ फक्त मुंबई आणि पुण्यासाठी लागू असेल. या पुढे मुंबई आणि पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर 54 रूपये ऐवजी 56 रूपयांनी मिळेल. अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे. शेतकर्‍यांच्या दुधाला प्रति लिटीर 40 रूपये भाव मिळावा अशी मागणी होत होती. सरकारने अनुदान देत आता 35 रूपये प्रति लिटर भाव शेतकर्‍यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे काही अंशी शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला मात्र झटका लागला आहे. दुधापासून बनणारे पदार्थ आणि दुधाची भूकटी यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे होणारा खर्च आणि तोटा याचा ताळमेळ बसवण्यासाठी आता गोकुळने मोठा निर्णय घेतल्याचे अरूण डोंगरे यांनी सांगितले. राज्यातल अन्य दुध उत्पादक संघांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टी लक्षात घेता गोकुळलाही दुधाच्या दरात वाढ करावी लागत आहे असेही ते म्हणाले. गोकुळचे दुध मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुण्यात जाते. मोठ्या संख्येने गोकुळचे ग्राहक या दोन शहरात आहेत. मुंबईत रोज 3 लाख लिटर दुध गोकुळ मार्फत वितरीत केले जाते. तर पुण्यात जवळपास 40,000 हजार लिटर दुध वितरीत केले जाते.

COMMENTS