मुंबई ः अतिशय थरारक अशा सामन्यात भारताने विजयाची गुढी उभारल्यानंतर त्यांचा सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. भारतीस संघाचे अभिनंदन केल्यानंतर ख
मुंबई ः अतिशय थरारक अशा सामन्यात भारताने विजयाची गुढी उभारल्यानंतर त्यांचा सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. भारतीस संघाचे अभिनंदन केल्यानंतर खासदार शरद पवार म्हणाले की, अर्जुनाचे लक्ष माशाच्या डोळ्यावर तसच आमचे लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले. तसेच विविध विषयांवर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवेसना एकत्र लढणार आहे अशी पवारांनी स्पष्ट केले.
यावेळी शरद पवार यांनी यावेळी टीम इंडियाच्या विजयावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ’’शनिवारच्या सामन्यात टीम इंडियाने अद्भूत खेळी केली. सुरुवातीला चिंता वाटावी अशी भारताची स्थिती होती. शेवटी शेवटी तर दक्षिण अफ्रिकेला 24 बॉलमध्ये 26 रन्सची आवश्यकता होती तेव्हा काही खेळाडूंनी दमदार खेळी करुन दाखवली. त्यामुळे आपल्याला यश मिळाले. राहुल द्रविडच्या रुपाने भारताला योग्य कोच मिळाला. द्रविडने योग्य मार्गदर्शन केले, टीमचा आत्मविश्वास वाढवला. याचा सामूदायिक परिणाम कालच यशामध्ये झालेला दिसला आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी सर्व खेळाडूंचे कौतूक आहे, असे शरद पवार म्हणाले. पुढे शरद पवार यांनी विधानसभेबाबत स्पष्ट भाष्य केले आहे.
आता लक्ष्य एकच आहे. उद्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक. या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवेसना एकत्र लढणार आहे. अर्जुनाचे लक्ष माशाच्या डोळ्यावर तसच आमचे लक्ष विधानसभा आहे’’, असे शरद पवार म्हणताच हशा पिकला. यावेळी शरद पवार म्हणाले, मागच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, डावे सुद्धा सोबत होते. त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. त्यांच्या हिताची जपणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे. तीन महिने हातात आहेत, असे शरद पवार म्हणाले. तसेच नुकतेच एका मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीने सगळ्यांना जमिनीवर आणले असे विधान केले होते. यावर शरद पवार यांनी टोला लगावला आहे. माझे पाय जमिनीवर आहेत, असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे ठेऊन निवडणूक लढवावी या राऊतांच्या मागणीवरही शरद पवार म्हणाले, ’’आम्ही तिघे एकत्र आहेत. आमचा सामूहिक चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेऊ इच्छितो असे शरद पवार म्हणाले.
COMMENTS