Homeताज्या बातम्यादेश

ओम बिर्ला पुन्हा लोकसभेच्या अध्यक्षपदी

आवाजी मतदानाने केली निवड

नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा संपुष्टात आली असून, गुरूवारी अवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदासा

‘पंतप्रधान किसान’साठी शेतकर्‍यांची ससेहोलपट
लपूनछपून फिरणारे पाच तडीपार झाले अखेर जेरबंद…
थंडीच्या लाटेने मुंबईसह राज्यात पारा घसरला

नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा संपुष्टात आली असून, गुरूवारी अवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घेत, काँगे्रस नेते राहुल गांधी यांना फोन केला होता. मात्र लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देत असाल तर आम्ही पाठिंबा देण्यास तयार असल्याची भूमिका काँगे्रसने घेतली होती. बुधवारी काँगे्रसकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी के. सुरेश यांनी अर्ज दाखल केला होता. लोकसभेत गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान मोदी यांच्यासह सत्ताधारी एनडीएच्या 13  घटक पक्षांनी देखील प्रस्ताव मांडला. पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, जीतनराम मांझी, कुमारस्वामी, चिराग पासवान,सुनील  तटकरे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी यांनी ओम बिर्ला यांच्या अर्जाला अनुमोदन दिले. यानंतर हा प्रस्ताव आवाजी मतदानाने स्वीकारण्यात आल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी केली.

यानुसार 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत पोहोचवले. तर दुसरीकडून विरोधकांचे उमेदवार के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. एन.के. प्रेमचंद्रन, पंकज चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिले. ओम बिर्ला आणि के. सुरेश यांचे प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मांडण्यात आल्यानंतर हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी आवाजी मतदान घेतले. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड करण्यात आल्याची घोषणा महताब यांनी केली. ओम बिर्ला हे राजस्थानातील कोटा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. याशिवाय त्यांनी 17 व्या लोकसभेत देखील लोकसभा अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

आम्ही विश्‍वासाच्या तत्वावर सहकार्य करू ः राहुल गांधी – राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांची दुसर्‍यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. लोकसभा हे सभागृह देशातील जनतेचा आवाज मांडणार आहे. लोकसभा अध्यक्ष या आवाजाचे रक्षणकर्ते आहेत. यावेळी विरोधी पक्षांचे बळ वाढलेले आहे. आम्ही विश्‍वासाच्या तत्त्वावर सहकार्य करु, असे राहुल गांधी म्हणाले. तुम्ही भारताच्या जनतेचा आवाज मांडण्याची संधी द्याल, अशी आशा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. या निवडणुकीत जनतेने विरोधी पक्षांवर संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली, असे राहुल गंधी म्हणाले.  

COMMENTS