Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचेही कर्ज माफ करा ः नाना पटोले

मुंबई ः राज्यातील भाजपप्रणित महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महायुतीच्या सरकारला शेतकर्‍यांचा कळवळा असेल तर

Nana Patole : अहंकारी, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला झुकावे लागले | LOKNews24
कोरडवाहूला एकरी 25 तर बागायतीला 50 हजारांची मदत द्या
नाना पटोलेंवर बोलणं शरद पवारांना न शोभणारे.. l LokNews24

मुंबई ः राज्यातील भाजपप्रणित महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महायुतीच्या सरकारला शेतकर्‍यांचा कळवळा असेल तर त्यांनी शेतकर्‍यांचेही कर्ज माफ करावे अशी मागणी काँगे्रसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  
विविध राज्यात शेतकर्‍याच्या दुधाला 45 रुपया पर्यंत भाव मिळत आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या दुधाला फक्त 27 रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला 55 ते 60 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत अन्यथा शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. गांधी भवन येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, श्‍वेतक्रांतीमध्ये ज्या दुध उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे योगदान आहे त्यांनाच राज्यातील भाजपा-शिंदे सरकार लुटत आहे. गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणार्‍या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत. हे दर वाढवून देऊन शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवावी असे नाना पटोले म्हणाले. काँग्रेस पक्षाने शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांचे सरसकट 2 लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे. 27 जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून भाजपा शिंदे सरकारनेही शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

COMMENTS