Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडी कारखाना मालमत्ता जप्तीचे साखर आयुक्तांचे आदेश

शेतकर्‍यांच्या ऊसाचे 21 कोटी रूपये थकविल्याप्रकरणी कारवाई

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याने शेतकर्‍यांच्या ऊसाचे 21 कोटी 3 लाख 50 हजार रुपये थकविले

शोरुम समोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न
कोपरगावमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात
नगर अर्बन वाचवण्यासाठी भाजप सरसावले ; सत्ताधार्‍यांचे खा. विखेंनंतर मंत्री कराडांना साकडे

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याने शेतकर्‍यांच्या ऊसाचे 21 कोटी 3 लाख 50 हजार रुपये थकविले आहेत. त्यामुळे साखर आयुक्त कुणाल खेमणार यांनी वसुलीसाठी कुकडी साखर कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करुन त्याची विक्री करावी व शेतकर्‍यांचे थकित पेमेंट द्यावेत असे आदेश दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमाठ यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
   श्रीगोंदा तालुक्यातील दिवंगत नेते कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील यांनी कुकडी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली त्यांच्या निधनानंतर माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली आहेत. शेतकर्‍यांच्या ऊसाचे गाळप होऊनही कारखान्याने शेतकर्‍यांच्या ऊसाचे पेमेंट दिले नाही.थकबाकी वसुली संबंधिचा आर आर सी चा प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालकांनी पुण्याच्या साखर आयुक्ताला पाठविला होता. त्यावर साखर आयुक्तांकडे सुनावणी होऊन कारखाना प्रशासनास म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर कारखान्याने काही रक्कम दिली आहे त्यानंतर कारखान्याकडे 15 कोटी 63 लाख 46 हजार रुपये थकबाकी व या रकमेवर होणारे 15 टक्के व्याज अशी बाकी आहे  

COMMENTS