मुंबई : ईव्हीएम हॅक होऊ शकतात असे एलॉन मस्क यांनी स्वतः सांगितले आहे. सध्या निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यालयातून चालते. त्यामुळे निवडणूक आयोग एल

मुंबई : ईव्हीएम हॅक होऊ शकतात असे एलॉन मस्क यांनी स्वतः सांगितले आहे. सध्या निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यालयातून चालते. त्यामुळे निवडणूक आयोग एलॉन मस्क यांच्यावरही कारवाई करेल. एलॉन मस्क देशात आले तर अटक सुध्दा करू शकते., असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईत माध्यमांशी ते बोलत होते. निवडणुकीत ईव्हीएमचा फ्रॉड झालेला आहे. आम्ही कोर्टात जाणार, आम्ही ही लढाई लढणार आणि जिंकणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले आहे की, उत्तर पश्चिम मतदार संघाबद्दल आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. हा विषय लावून धरलेला आहे. या सगळ्या संदर्भात आम्ही कोर्टात जाणार आहोत. निवडणुकीत ईव्हीएमचा फ्रॉड झाला आहे. या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग समोर आलेला आहे. आम्हीही लढाई लढणार आणि जिंकणार. एलॉन मस्क यांनी स्वतः सांगितलं इव्हिएम हॅक होऊ शकतात.
ईव्हीएम नसता तर भाजपला 40 पण जागा मिळाल्या नसत्या – ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यालयातून चालते. त्यामुळे निवडणूक आयोग एलॉन मस्क यांच्यावरही कारवाई करेल. एलॉन मस्क देशात आले तर अटक सुध्दा करू शकते. 303 नंतर हुकूमशाहाला आम्ही 240 वर आणला आहे. ईव्हीएम नसता तर भाजपला 40 जागा पण मिळाल्या नसत्या, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात रवींद्र वायकर यांच्या अवघ्या 48 मतांनी विजय झाला. या मतदार संघातील ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे सापडल्याने महाविकास आघाडीकडून महायुतीवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया हा रडीचा डाव बंद करा, असे रवींद्र वायकर म्हणाले. वायकरांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी आता पलटवार केला आहे. रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, रडत कोण आहे, हे आम्हाला स्वतः माहित आहे.
COMMENTS