Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनईत सलग चौथ्या दिवशीही पाऊस

वंजारवाडीत कोसळली वीज

सोनई ः गेल्या काही दिवसापासून सलग चार दिवसापासून कधी सकाळी,कधी दुपारी,कधी सायंकाळी,कधी रात्री दमदार पाऊस पडत असताना काल सकाळी सकाळी साडेसातच्या स

गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मागे
गरजूवंतांना मिळणार घरकुलाचा लाभ : आ. खताळ
शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा l पहा LokNews24

सोनई ः गेल्या काही दिवसापासून सलग चार दिवसापासून कधी सकाळी,कधी दुपारी,कधी सायंकाळी,कधी रात्री दमदार पाऊस पडत असताना काल सकाळी सकाळी साडेसातच्या सुमारास वीज कोसल्याची घटना घडली. दुर्दयाने जीवित हानी झालेली नाही .याबाबद  माहिती की, वंजरवाडी येथील रहिवासी असलेल्या लहू सोपान दराडे यांच्या घरासमोर असलेल्या उंच नारळ च्या झाडावर वीज कोसळली आणि त्या झाडातून वीजप्रवाह होऊन घरातील इंव्हटर जळून खाक झाले आहे.सुद्वायावयाने जीवित हानी झाली नाही,मात्र तेथे असलेले त्यांच्या मातोश्री व भावजयी काही क्षणात डोळे अंधारमय होऊन घबराट उडाली होती. शेजारी असलेल्या संभाजी दराडे,साहेबराव दराडे,सुभाष दराडे,यांचेही कुटुंब बचावले आहे.पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे. शेती मशागती होऊन शेतकरी शेतीकडे लक्ष देताना दिसत आहे.यंदाच्या वर्षी सर्वात अधिक तापमानाची नोंद झाली होती. आता चार दिवसापासून विजेसह पावसाच्या सरी कोसळत आहे.मृग नक्षत्र वेळेवर पडला आहे,त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.सोनई परिसरात रोजच पाऊस पडत असल्याने,दरम्यान दिवसभर ढगाळ वातावरण अजूनही कायम आहे.

COMMENTS