Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळशेज घाटात दरड कोसळून काका-पुतण्याचा मृत्यू

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतांना दिसून येत आहे. माळशेज घाटात देखील रिक्षा

औषधाचे पैसे मागितले म्हणून तलाठ्याची मेडिकल मालकाला मारहाण
स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शिधापत्रिकाधारकांना मोफत साड्या वाटप
जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतांना दिसून येत आहे. माळशेज घाटात देखील रिक्षावर अचानक डोंगरकडा पडल्यामुळे यात काका-पुतण्या या दोघांचा मृत्यू झाला असून, आणखी तिघेजण जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबईतील रहिवासी असणारे 30 वर्षीय राहुल भालेराव आणि 7 वर्षीय स्वयंम भालेराव अशी मृत्यू झालेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. भालेकर कुटुंब मंगळवारी रात्री मुलुंडहून चंदनापुरी संगमनेर या त्यांच्या मूळ गावी रिक्षेने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. टोकावडे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये माळशेज घाटातील बोगद्याजवळ महादेवाच्या मंदिर परिसरात हा अपघात झाला आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामध्ये डोंगरावरील मलबा भालेकर कुटुंबीयांच्या रिक्षेवर पडला. या अपघातात चालक राहुल भालेराव आणि त्यांचा सात वर्षांचा पुतण्या स्वयम भालेरावचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षेतील अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. रिक्षातील तीन जणांचा जीव थोडक्यात वाचला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे.

COMMENTS