Homeताज्या बातम्याविदेश

कुवेतमध्ये होरपळून 41 जणांचा मृत्यू

मृतांमध्ये 10 भारतीय असल्याचा अंदाज

कुवेत/वृत्तसंस्था ः कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला गुरूवारी आग लागली असून, यामध्ये तब्बल 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आह

कराडात 32 वर्षीय महिलेचा खून; शहरात खळबळ (Video)
बीड जिल्ह्यातील उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बैठक घेणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
राजू नाईकला अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार अटक करा

कुवेत/वृत्तसंस्था ः कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला गुरूवारी आग लागली असून, यामध्ये तब्बल 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये किमान 10 भारतीयांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. त्यापैकी 5 जण केरळचे रहिवासी होते. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कुवेतच्या वेळेनुसार सकाळी 6 वाजता हा अपघात झाला. पहाटे लागलेली आग संपूर्ण इमारतीत पसरली. अनेक लोक इमारतीत अडकले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मेजर जनरल ईद रशीद हमद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, या इमारतीत अनेक स्थलांतरित मजूर राहतात. कुवेतमधील घटनेबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वक्तव्यही समोर आले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ते म्हणाले की, कुवेतमध्ये झालेल्या अपघातामुळे मला धक्का बसला आहे. तेथे सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही तपशील बाहेर येण्याची वाट पाहत आहोत. भारतीय राजदूत घटनास्थळी रवाना झाले आहेत. ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांच्यासाठी मी शोक व्यक्त करतो.

COMMENTS