हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री 10 वाजपेर्यंत परवानगी : राजेश टोपे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री 10 वाजपेर्यंत परवानगी : राजेश टोपे

मुंबई - कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीनंतर काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हॉटेल, रेस्तरॉ, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंत स

आदर्श शाळा बांधकामासाठी 494 कोटींना मंजुरी l DAINIK LOKMNTHAN
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेचा ‘मेगा प्लॅन’… १७७५ कोटी करणार खर्च…
राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीनंतर काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हॉटेल, रेस्तरॉ, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यानुसार आता 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.
सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. त्याचबरोबर सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे. इनडोअर स्पोर्ट्समधील खेळाडू व तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांचे देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असतील तर, जे काही इनडोअर स्पोर्ट्स आहे त्यामध्ये मग बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी सर्व खेळांना परवानगी दिली गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. त्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपासून मोठ्या पद्धतीने ज्या शिथिलता दिलेल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसर्‍या डोस नंतरचे 14 दिवस झालेले असणे आवश्यक आहे. अशा व्यक्तिंना प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. त्यामध्ये त्याचे स्वतःचे ओळखपत्र आणि डबल डोस घेतल्याचे प्रमाणपत्र हे जर त्या ठिकाणी दाखवलं तर, मासिक आणि त्रैमासिक पासेस देण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत. नियम न पाळणार्‍यांना 500 रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.

सीकरण पूर्ण झालेल्या आस्थापना पूर्ण क्षमतेने होणार सुरू
शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी या सगळ्यांना प्राधान्याने कोविड लस देण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेले आहे. त्यामुळे खासगी औद्योगिक व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांचे ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जी खासगी कार्यालयं आहेत, त्या ठिकाणी 24 तास खासगी कार्यालयं सुरू राहू शकतील, हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे. कारण एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खासगी कार्यलायांनी त्यांच्या गरजे प्रमाणे एका सत्रात 25 टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवली तर, आपल्याला खासगी कार्यालयं सुरू ठेवता येतील, अशी सूचना करण्यात आलेली आहे.

COMMENTS