Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरच्या शनैश्‍वर यात्रेतील कुस्ती हगाम्याची सुरूवात

खंडीत परंपरा गावकरी मंडळाने पुन्हा नव्याने केली सुुरु

बेलापूर ः गावाकरी मंडळ तसेच बेलापूर-ऐनतपूरचे ग्रामस्थांनी शनियात्रोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या कुस्तीच्या हगाम्यास ग्रामस्थांचा उत्फूर्त प्रत

महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
भाजप राज्यपालांची अजून किती अप्रतिष्ठा करणार..?;पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल
कुणी घेतेय आ. लंकेंची..तर कुणी देवरेंची बाजू; पारनेरच्या वादाचे राज्यभरात उमटले पडसाद

बेलापूर ः गावाकरी मंडळ तसेच बेलापूर-ऐनतपूरचे ग्रामस्थांनी शनियात्रोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या कुस्तीच्या हगाम्यास ग्रामस्थांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला.तब्बल चाळीस वर्षानंतर खंडीत कुस्तीच्या हगाम्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शना खाली गावकरी मंडळाने पुनरुज्जीवन केले. या कुस्ती हगाम्यास दीडशे कुस्तीपटूंनी हजेरी लावली.
सुमारे 60 वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच स्व. भागवतराव खंडागळे, स्व दामोदर नवले, बाबूराव बंगाळ या धुरंधरांनी वज्रदेही तालीम स्थापन करुन कुस्ती  हगाम्याची परंपरा सुरु केली. बेलापूरने स्व.अगस्ती देसाई, स्व. ज्ञानदेव गुलदगड,स्व.वसंत कुंभकर्ण,स्व.अशोक जगताप,तानाजी जावरे, स्व.उत्तम खरात असे मल्ल घडविले. शनीयाञेनिमित्त कुस्तीचा हगामा सुरु केला गेला. हगाम्याची परंपरा बरेच वर्षे टिकली. मात्र सन 1984 नंतर हि परंपरा खंडीत झाली. यावर्षी गावकरी मंडळाने हि खंडीत परंपरा पुन्हा सुरु केली त्यास ग्रामस्थांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. बेलापूरच्या हगाम्याच्या कुस्त्याच्या दंगलीत हरियानातील पैलवान मल्ल सोनल ठाकूर, महिला कुस्तीपटू कु.गायत्री थोरात  राहुरी हिला महिलाजोड न मिळ्यामुळे तीने मैदानात प्रवेश केल्यानंतर आमची ताई,आमचा अभिमान असल्याचे सांगुन तिला रोख रुपये एक हजार देवून संयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सुमारे तीन तास चाललेल्या  हगाम्यात महाराष्ट्र कुस्ती चॅपियन मल्ल नरेंद्र टकले, मल्ल सागर कोल्हे, नारायण हारदे, कृष्णा काळे, लक्ष्मण जाधव, अक्षय वडितके, सुनिल गागुर्डे आदीसह सुमारे दीडशे मल्ल पैलवानांनी आपली कुस्ती कला  दाखविली.शेवटची निकाली कुस्ती मल्ल लक्ष्मण निर्गुडे व सागर कोल्हे  यांच्यात  झाली. यात सागर कोल्हे हा विजेता ठरला. हगामा संयोजकांच्या कडून विजेत्यास सोन्याचे पदक रोख रक्कम देवून त्याचा सन्मान करण्यात आला. उपविजेता लक्ष्मण निर्गुडे यास चांदीचे पदक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. गौतम उपाध्ये, रविंद्र वाघ, सुनिल खपके, सुरेश होन, आबा बडाख यांनी पंच म्हणून काम पाहिले. कुस्तीच्या हगाम्याची प्रथा बंद पडु नये म्हणून भाऊ डाकले, अरुण शिंदे,देवमन भगत, अभिषेक खंडागळे मित्र मंडळ यांनी प्रत्येकी 5000 रु., मेनरोड मित्र मंडळाने सोन्याचे व चांदीचे पदक,जेष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे यांनी 2100 रुपये गावकरी मंडळाकडे सुर्पुत केले. ग्रामस्थाकडून कुठलीही लोकवर्गणी न घेता कार्यकर्त्यांच्या निधीतून हगाम्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे जि. प.सदस्य शरद नवले व कृषी उपन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी सांगितले.गावकरी मंडळाचे नेते जि.प, सदस्य शरद नवले, कृषी उपन्न बाजार समितिचे उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच स्वाती अमोलिक,उपसरपंच मुस्ताक शेख, प्रफुल्ल डावरे, जालिंदर कुर्‍हे, भाऊसाहेब कुताळ, पुरुषोत्तम भराटे, एकनाथ उर्फ लहानू नागले,बाळासाहेब दाणी, सुभाष अमोलिक, भास्कर बंगाळ, मोहसीन सय्यद, प्रभात कुर्‍हे, शफिक बागवान, प्रशांत मुंडलिक, रविंद्र कुताळ, सचिन वाघ, विशाल आंबेकर, भैय्या शेख, रावसाहेब अमोलिक, गोपी दाणी, महेश कुर्‍हे, पप्पू खरात, भाऊसाहेब तेलोरे, प्रविण बाठिया, दिलीप दायमा, रमेश काळे, अशोक वहाडणे, अमोल गाडे,अन्नू भाई सय्यद, प्रल्हाद अमोलिक, प्रशांत लड्डा, शांतीलाल हिरण, अविनाश अमोलिक, आदित्य जाधव, राम कुर्‍हे, बाळासाहेब शेलार, बबनराव मेहेत्रे, जीना शेख, दिपक पांडागळे, सचिन मेहेत्रे, नवनाथ धनवटे, अक्षय दहिवाळ, पोपट पवार, राहुल माळवदे, रोहित शिंदे, सागर ढवळे, ओंकार साळुंके, राज गुडे, जय संचेती, किरण काळे, कय्युम कुरेशी, रमेश कुमावत आदी यावेळी उपस्थित होते. गावकरी मंडळाच्या सर्व कार्यकर्ते, बेलापूर पोलीस औट पोस्ट चे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच बेलापूर-ऐनतपूरचे कुस्तीप्रेमी यांच्या विशेष परिश्रमातून  कुस्त्यांचा हगामा यशस्विरित्या संपन्न झाला.

COMMENTS