नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 9 हजार 355 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 9 हजार 355 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5,31,424 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात बुधवारी 26 एप्रिल रोजी कोरोनाचे 9,629 रुग्ण आढळले होते. तसेच, 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मृतांमध्ये केरळच्या 10 रुग्णांचा समावेश आहे. याबाबत आज जाहीर झालेल्या आकडेवारीनंतर भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 57 हजार 410 वर पोहोचली आहे.
COMMENTS