Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासींच्या विकासासाठी 8.81 कोटींचा निधी मंजूर

आमदार आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव ः कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावांना समसमान न्याय देवून प्रत्येक गावाला विकासासाठी निधी दिला आहे. त्याप्रमाणेच मतदार संघातील प्रत्येक गा

डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेकडून ग्राहकांना मोबाईल बँकिंग सेवा
आ. आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ’बकरी ईदच्या’ शुभेच्छा
येवलाच्या व्यापार वृद्धीसाठी गौतम बँकेची मदत होईल

कोपरगाव ः कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावांना समसमान न्याय देवून प्रत्येक गावाला विकासासाठी निधी दिला आहे. त्याप्रमाणेच मतदार संघातील प्रत्येक गावातील आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत कोपरगाव मतदार संघातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी 8.81 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वाड्या वस्त्यावर राहत असून अतिशय कष्टाळू समाज म्हणून या समाजाकडे पाहिले जाते. मागील काही वर्षापासून आदिवासी वस्तीचा विकास न झाल्यामुळे आदिवासी बांधव मुलभूत सुविधांपासून वंचित होते. या समाजाला पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी यापूर्वीही आ.आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुययांचा निधी आणला असून अधिकचा निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी 8.81 कोटी निधी मंजूर केला आहे. यामध्ये मतदार संघातील सर्वच गावांचा समावेश असून प्रत्येक गावात विविध विकास कामे केली जाणार आहेत यामध्ये आदिवासी वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रस्ते काँक्रीटीकारण करणे, बंदिस्त गटार बांधणे, समाज मंदिर बांधणे, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे, सांस्कृतिक भवन बांधणे, विविध मंदिर सुशोभिकरण करणे, स्मशानभूमी सुशोभिकरण करणे आदी कामांचा समावेश असून मतदार संघातील प्रत्येक गावातील आदिवसी वस्तीत हि कामे होणार आहेत. त्यामुळे आदिवासी वस्तीत वास्तव्य करणार्‍या समाज बांधवांच्या अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील हजारो समाज बांधवांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून निधी मंजूर केल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आभार मानले आहे.

COMMENTS