Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये बीड जिल्ह्यातील 779 प्रकरणे निकाली

बीड : दि. 14 मार्च 2026 रोजी बीड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत जिल्ह्यातील एकूण 779 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्या

तांबवा येथे जुन्या वादातून तरुणावर कत्तीने हल्ला,पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद
येडेश्वरीचे सर्वाधिक गाळप; कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या संपन्न 9.22 लाख मेट्रिक टन ऊस गाळप; खा.बजरंग सोनवणे यांनी शेतकरी-कामगारांचे केले कौतूक
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जल्लोष; आदित्य शिक्षण संस्थेच्या स्नेहसंमेलनाची उत्साहात सुरुवातपारंपरिक नृत्य, देशभक्तीपर गीत व समूह सादरीकरणांनी पहिल्या दिवसाला रंगत

बीड : दि. 14 मार्च 2026 रोजी बीड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत जिल्ह्यातील एकूण 779 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून सुमारे 15 कोटी 56 लाख 73 हजार 59 रुपयांच्या प्रकरणांचा निकाल लागला आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ मा. आनंद एल. यावलकर, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा न्यायाधीश-2 मा. एस. आर. शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 मा. आर. एम. नेरलीकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डब्ल्यू. ए. सय्यद, तसेच बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस. जी. पिसुरे, उपाध्यक्ष आर. व्ही. देशमुख, संघटनेचे पदाधिकारी व अनेक विधिज्ञ उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत आयोजित करण्यात आली. या लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित 12,547 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भूसंपादन तसेच एन.आय. अ‍ॅक्ट कलम 138 अंतर्गत प्रकरणांचा समावेश होता. यापैकी 495 प्रकरणे निकाली निघाली. तसेच दाखलपूर्व टप्प्यातील 22,001 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 284 प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे एकूण 779 प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला. बीड मुख्यालयातील कौटुंबिक न्यायालयातील 2 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये दोन महिलांच्या सासरी नांदण्याच्या प्रकरणांना यश मिळाले. तसेच मोटार अपघात प्रकरणात एका पीडितास 1 कोटी 20 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. डब्ल्यू. ए. सय्यद, सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सरकारी अभियोक्ता तसेच न्यायालयीन, बँक, पोलीस व इतर कार्यालयीन कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS