Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरेच्या आय.टी आयच्या 77 मुलांना नामांकित कंपन्यामध्ये नोकरी

लोणी ःलोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील आय.टी आय मधील विविध ट्रेडमधील 77 विद्यार्थ्याची नामांकीत

निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकल्या
श्रीगोंदा शुगर या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

लोणी ःलोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील आय.टी आय मधील विविध ट्रेडमधील 77 विद्यार्थ्याची नामांकीत कंपन्यामध्ये निवड झाल्याची माहीती प्राचार्य अर्जुन आहेर यांनी दिली.
       विद्यार्थ्याना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड अहमदनगर,जी.एम.सी.सी. इंडिया लिमिटेड सुपा,महिंद्रा  महिंद्रा नाशिक,इपिटॉम काम्पोनन्ट लिमिटेड सुपा,के.एस.पी.जीऑटोमोटीव्ह सुपा या कंपन्यामध्ये 77 विद्यार्थ्याची निवड झाली. ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी आय.टी.आय. लोणी अंतर्गत विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवार फेरी, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने,  औद्योगिक कंपनी भेटी, कार्यानुभव उपक्रम, विविध मेळावे इ. उपक्रमाचा समावेश असतो.यामुळे नोकरी उपलब्ध करुन देण्यात प्रवरा कायमचं अव्वल स्थानावर राहीली  असे संस्थेचे प्लेंसमेंट विभागाचे प्रमुख डॉ.मनोज परजणे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या  यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालक डॉ.प्रदिप दिघे, संचालिका सौ.लिलावती सरोदे, , प्राचार्य अर्जुन आहेर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS