Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड नगरपरिषदेच्या मलनिःस्सारण प्रकल्पास 77 कोटी मंजूर

आमदार प्रा. राम शिंदे यांचा पाठपुरावा

जामखेड ः जामखेड नगरपरिषदेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी महायुती सरकारने 77 कोटी 53 लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. सदर कामास प्रशासकीय मंजु

एकही पात्र लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहणार नाही
सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश
’लाडकी बहीण’ योजनेपासून पात्र महिला वंचित राहणार नाहीत

जामखेड ः जामखेड नगरपरिषदेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी महायुती सरकारने 77 कोटी 53 लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. सदर कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे.
राज्यातील नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता राज्य सरकारकडून नगरोत्थान अभियान राबविण्यात येते. याच अभियानातून जामखेड शहराचा मलनि:स्सारण प्रकल्प व्हावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. या प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी सुधारित तांत्रिक मान्यता दिली होती. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत गठित प्रकल्प मान्यता आणि संनियत्रण समितीच्या 2 फेब्रुवारी 2024 च्या बैठकीत सदर प्रकल्प मंजुरी देण्यात आली होती.  मराठवाड्याच्या सरहद्दीवरील महत्वाचे शहर म्हणून जामखेडला ओळखले जाते. येथील बाजारपेठे मोठी आहे.नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळण्यासाठी आमदार प्रा. राम यांनी जामखेड शहरासाठी मलनिस्सारण प्रकल्प मंजुर करून आणल्याबद्दल शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

जामखेड शहर झपाट्याने विकसीत होत आहे. शहरातील नागरिकांना दर्जेदार मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माझा नेहमी प्रयत्न सुरु असतो. शहर स्वच्छ सुंदर असावं, गटारमुक्त, डासमुक्त असावं, यासाठी जामखेड शहर मल:निस्सारण प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा हाती घेतला होता. महायुती सरकारने जामखेड शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जामखेड नगरपरिषद मलनि:स्सारण प्रकल्पास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 77.53 कोटींचा भरीव निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार !
प्रा.राम शिंदे, आमदार

COMMENTS