पुणे : मुसळधार पाऊस आणि पुरानंतर पुणे शहरात झिकाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. एकाच दिवशी सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सहा गर

पुणे : मुसळधार पाऊस आणि पुरानंतर पुणे शहरात झिकाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. एकाच दिवशी सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सहा गर्भवती महिला आहेत. शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात झिका विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बुधवारीही शहरात संसर्गाचे 7 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) सादर केलेल्या अहवालानुसार यामध्ये 7 गर्भवती महिलांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जूनपासून आतापर्यंत सुमारे 81 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एका वरिष्ठ आरोग्य अधिकार्याने सांगितले की, आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे, परंतु झिका संसर्गाव्यतिरिक्त ते सर्व इतर अनेक आजारांनी ग्रस्त होते. एकूण संक्रमित लोकांमध्ये 26 गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे, परंतु सुदैवाने त्यापैकी बहुतेक आता निरोगी आहेत आणि त्यांना बरे वाटत आहे, या वर्षी 20 जून रोजी शहरात झिका विषाणू संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. एरंडवणे भागातील एका 46 वर्षीय डॉक्टरची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ही बाब समोर आली होती.
COMMENTS