Homeताज्या बातम्यादेश

देवदर्शनावरुन परततांना 7 भाविकांचा मृत्यू

विजयनगर ः कर्नाटकातील विजयनगरमध्ये विचित्र रस्ते अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजयनगरमधील होसपेटजवळ तीन वाहनांची धडक जोरदार झाली. खाणका

रावणाचं दहन करताना झाला मोठा अपघात
पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले.
नाशिक – औरंगाबाद मार्गावर खाजगी बसचा मोठा अपघात

विजयनगर ः कर्नाटकातील विजयनगरमध्ये विचित्र रस्ते अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजयनगरमधील होसपेटजवळ तीन वाहनांची धडक जोरदार झाली. खाणकामातील दोन टिप्पर लॉरी आणि क्रूझर कार यांच्यात ही भीषण टक्कर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझरमध्ये 13 जण प्रवास करत होते. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉसपेट शहराच्या बाहेरील मरियमनहल्ली पोलिस स्टेशनजवळ ही घटना घडली. लॉरीचा एक्सल तुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हॉसपेट येथील रहिवासी बसवेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

COMMENTS