Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्यासह 7 कोंबड्या ठार; चार शेळ्या गायब; अंदाजे साडेचार लाखांचे नुकसान

उपवळे : संकेत पाटील यांच्या शेतामध्ये असणार्‍या बंदिस्त गोठ्यात बिबट्याने हल्ला करून गोठ्यातील मृत शेळ्या. शिराळा / प्रतिनिधी : उपवळे, ता. शिराळा

‘पीएम किसान’, ‘नमो शेतकरी’साठी साडेतेरा लाख शेतकरी पात्र
कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना भूकंपग्रस्तांचे दाखले वाटप
राजारामबापू कारखाना हुकुमशाहीचा अड्डा : धैर्यशील मोरे

शिराळा / प्रतिनिधी : उपवळे, ता. शिराळा येथील संकेत सुनील पाटील यांच्या शेतातील जनावरांच्या शेडवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 10 शेळ्या व 7 कोंबड्या ठार केल्या. तसेच चार शेळ्या गायब आहेत. या घटनेत सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उपवळे, ता. शिराळा येथे मागील दोन तीन दिवस बिबट्याचा वावर सलग या परिसरात दिसत असुन शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या आगोदर शुक्रवारी बिबट्याने उपवळे गावातील जवळपास चाळीस देशी कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने संकेत पाटील यांच्या शेतामध्ये असणार्‍या बंदिस्त गोठ्यात हल्ला करून गोठ्यात असणार्‍या 7 जातीच्या शेळ्या तर 3 बोकड असे 10 भोर जातीच्या शेळ्या ठार केल्या. यावेळी झालेल्या झटापटीत चार मोठ्या शेळ्या बिबट्याने गायब केल्या असल्याची माहिती शेतकरी संकेत पाटील यांनी दिली. याच बरोबर चार कोंबडे व तीन कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. रात्रीच्या वेळेस शेडमध्ये सात फुटावर लावलेल्या जाळी वरून बिबट्याने आत येत हा हल्ला केला आहे. या प्रकाराने भागात एकच खळबळ उडाली आहे. अंदाजे शेतकर्‍यांचे साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी अरगडे यांनी मृत शेळ्यांची तपासणी करून शवविच्छेदन केले. घटनास्थळास वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याप्रसंगी वनपाल चंद्रकांत देशमुख वनरक्षक हनुमंत पाटील उपस्थित होते.फोटो ओळ

COMMENTS