Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.6 टक्क्यांची वाढ

अर्थमंत्री अजित पवारांकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर

मुंबई ः राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवापासून सुरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्याची दिवशी अर्थमंत्री अजित पवारांनी महाराष्ट

15 हजारची लाच स्विकारल्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍यासह शिक्षकास अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास ः ना. राधाकृष्ण विखे पाटील
वीज कर्मचारी संप आणि….. 

मुंबई ः राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवापासून सुरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्याची दिवशी अर्थमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा 2023-24 चा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडला. या अहवालात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.6 क्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्याच्या कृषी व कृषीपुरक क्षेत्रातही 1.9 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
अजित पवारांनी सादर केलेल्या पाहणी अहवालानुसार, राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्राचा एकंदरीत विचार करता पिकांच्या विभागात 1.5 टक्के घट होऊ शकते. तर, वन संवर्धनात 9.2 टक्के, मासेमारी व जल संवर्धनात 2.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्रात 7.6 टक्के, वस्तू निर्मिती क्षेत्रात 7.5 टक्के, बांधकामात 6.2 टक्के, राज्याच्या व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स व उपहारगृहे, वाहतूक, साठवण व दळणवळण, तसेच प्रसारणाशी संबंधित सेवा क्षेत्रांत 6.6 टक्के, वित्तीय, स्थावर मालमत्ता व व्यावसायिक सेवांमध्ये 10.1 टक्के वाढ अपेक्षित आहे, सार्वजनिक प्रशासन, सुरक्षा व इतर सेवांमध्ये 7.6 टक्के, तर सेवा क्षेत्रात 8.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात राज्याच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्राचा सर्वात मोठा (63.8 टक्के) वाटा असून त्याखालोखाल उद्योग (25 टक्के) क्षेत्राचा नंबर लागतो. कृषी व संलग्न कार्यांममध्ये 11.2 टक्के वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दशकभराचा विचार करता राज्याच्या विकासात सेवा क्षेत्राचा सरासरी 57.1 टक्के हिस्सा असून त्याखाली उद्योग (30.9 टक्के) क्षेत्राचा नंबर लागतो. तर, कृषी आणि इतर संलग्न क्षेत्रांची 12 टक्के हिस्सेदारी आहे. 2023-24 चे राज्याचे उत्पन्न 40.44 लाख कोटी रुपये असून त्यामध्ये आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 10.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर देशांतर्गत उत्पन्न 293.90 लाख कोटी रुपये असून त्यात 2022-23 च्या तुलनेत 9.1 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2023-24 मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न 2,77,603 रुपये एवढे अपेक्षित असून 2022-23 मध्ये ते 2,52,389 रुपये एवढे होते.

राज्याचा आज अंतरिम अर्थसंकल्प – राज्य विधिमंडळाला गुरूवारपासून सुरूवात झाली असून, राज्य सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. कारण पुढील तीन महिन्यानंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विरोधक आक्रमक पवित्रा घेत असतांनाच राज्याचा आज शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार नेमक्या कोणत्या घोषणा या अर्थसंकल्पात करतात, याकडे राज्याचे लक्ष असेल.

COMMENTS