पुणे ः पुणे जिल्हयातील भोर परिसरात स्वस्तात शेतजमीन विकत घेवून देतो, असे आमिष दाखवून एका इसमाची सुरुवातीला 60 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्
पुणे ः पुणे जिल्हयातील भोर परिसरात स्वस्तात शेतजमीन विकत घेवून देतो, असे आमिष दाखवून एका इसमाची सुरुवातीला 60 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर त्यास धमकावून आर्थिक नुकसानीची भीती घालत आणखी सहा लाख रुपये जबरदस्तीने घेऊन एकूण 66 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. याबाबत फत्तेसिंह नानासाहेब पाटील (वय-59,रा.भोसलेनगर,पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार राजेश अंकुश पोटे , संदेश अंकुश पोटे, प्रियांका निलेश सुर्यवंशी (सर्व रा.वडगाव बुद्रुक,पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरेपींची नावे आहे. सदरचा प्रकार जानेवारी 2015 ते आजपर्यंत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तीन आरोपींनी तक्रारदार फत्तेसिंह पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्यांना भोर परिसरात स्वस्त दरात चांगली शेतजमीन विकत घेवून देतो असे आरोपींनी सांगितले.
COMMENTS