Homeताज्या बातम्यादेश

ब्राझीलमध्ये विमान कोसळून 61 जणांचा मृ्त्यू

नवी दिल्ली ः ब्राझीलच्या साओ पाउलोजवळ शुक्रवारी 61 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले, त्यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या प्रादेशिक

सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा
महीपाल देशमुख यांना ध्येय गौरव पुरस्कार
आदिवासी कुकी महिलांनी जपला बंधुभाव; लातूरकरांचे मणिपूरमध्ये रक्षाबंधन!

नवी दिल्ली ः ब्राझीलच्या साओ पाउलोजवळ शुक्रवारी 61 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले, त्यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या प्रादेशिक विमान कंपनी व्होएपासने एका निवेदनात ही माहिती दिली. साओ पाउलो राज्यातील विन्हेडो येथे विमान कोसळले आणि निवासी भागात पडलं अशी माहिती समोर येत आहे. यामध्ये एका घराचे देखील नुकसान झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. मात्र घरातील कुणालाही इजा झालेली नाही.  छोटे डबल इंजिन असलेल्या विमानाने दक्षिण ब्राझीलमधील पराना राज्यातील कॅस्केवेल शहरातून उड्डाण केले आणि ते साओ पाउलो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते.

COMMENTS