कर्जत-जामखेड ः कर्जत व जामखेड तालुक्यातील 6 रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामविकास विभागाकडून 60 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना स

कर्जत-जामखेड ः कर्जत व जामखेड तालुक्यातील 6 रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामविकास विभागाकडून 60 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. कर्जत-जामखेड मतदारसंघातील काही रस्ते खराब झाले होते. या रस्त्यांची सुधारणा व्हावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्त्यांनी आ. शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. ग्रामविकास विभागाने कर्जत तालुक्यातील 5 व जामखेड तालुक्यातील एक अशा 6 रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देत 60 लाखांचा निधी मंजुर केला आहे. 2024 – 2025 या आर्थिक वर्षासाठी 3054 2419 या लेखाशिर्षाखाली रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब मधून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने जारी केला आहे.
या रस्त्यांसाठी निधी मंजूर : – ग्रामविकास विभागाने कर्जत तालुक्यातील मुसलमान वस्ती दुरगाव केदळेवस्ती रस्ता, दगडवाडी ओमानवाडी ते कौडाणे ते ग्रामीण मार्ग 7, राज्य मार्ग 67 जलालपुर ते पवारवस्ती नंबर दोन, प्रजिमा 54 ते भिसे वस्ती (जवळकेवाडी), राज्य मार्ग 68 ते जांभळकर वस्ती, तर जामखेड तालुक्यातील राज्य मार्ग 56 ते हनुमान वस्ती रस्ता या 6 कामांना प्रत्येकी 10 लाख रूपये असा 60 लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे.
COMMENTS