Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदार

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 3 लाख 84 हजार 69 पुरुष मतदार, 2

खा. शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक
 माझा घातपात नसुन अपघात होता – आ.बच्चू कडू  
म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा ; खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 3 लाख 84 हजार 69 पुरुष मतदार, 2 लाख 57 हजार 317 महिला दिव्यांग मतदार, तसेच 39 तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार आहेत. पुणे येथे 88 हजार 937 दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये 48 हजार 626 पुरुष, 40 हजार 301 महिला आणि 10 तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. पुणे पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात 38 हजार 149 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 21 हजार 573 पुरुष मतदार, 16 हजार 573 महिला मतदार आणि 3 तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची सर्वात कमी नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे 6 हजार 43 दिव्यांग मतदारांची नोंद आहे. यामध्ये 3 हजार 710 पुरुष आणि 2 हजार 333 महिला दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. राज्यात तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 39 आहे. सर्वाधिक तृतीयपंथी दिव्यांग मतदार औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. एकूण 12 तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. पुणे जिल्ह्यात 10, नांदेड जिल्ह्यात 6, ठाणे जिल्ह्यात 3, आणि पालघर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी 2 तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. याशिवाय मुंबई उपनगर, लातूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 तृतीयपंथी दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत.

COMMENTS