Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 546 कोटींची मालमत्ता जप्त ; भरारी पथकाची कारवाई

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबरच्या काळात बेकायदा पैसे

एकलहरे दरोड्यात पत्नीनेच केला पतीची गळा आवळून खून
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना तीन वर्षांची मुदतवाढ
काँगे्रसचे आमदार फुटण्याची शक्यता नाही

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबरच्या काळात बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 546 कोटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल अ‍ॅपवर एकूण 7 हजार 400 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 7 हजार 360 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे प कोणत्याही पस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

COMMENTS