Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

५२ वे संगमनेर तालुका विज्ञान, गणित  प्रदर्शन संपन्न

संगमनेर : ५२ वे संगमनेर तालुका विज्ञान, गणित प्रदर्शन, सिद्धार्थ विद्यालय प्रांगणात संपन्न झाले. नवनिर्वाचित आ. अमोल खताळ यांच्या शुभहस्ते विविध

सावेडीतील बहुचर्चित रस्ता अखेर गुंडाळला ; अर्धवट अवस्थेतील काम मनपाने केले रद्द, शासनाला पैसेही परत पाठवले
निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा
साकुरी ग्रामपंचायतीकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाडीची खरेदी

संगमनेर : ५२ वे संगमनेर तालुका विज्ञान, गणित प्रदर्शन, सिद्धार्थ विद्यालय प्रांगणात संपन्न झाले. नवनिर्वाचित आ. अमोल खताळ यांच्या शुभहस्ते विविध दालनांचे उद्घाटन झाले. यावेळी आ. खताळ यांनी विद्यार्थ्यांच्या उपकरणास भेट दिली व समाधान व्यक्त केले. समाजात विविध समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपकरणे बाल वैज्ञानिकांनी तयार केलेली आहे. आजचे विद्यार्थी उद्या वैज्ञानिक होतीलया शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बी.आर.कदम सर (अध्यक्ष -बहुजन शिक्षण संघ ) होते. बहुजन शिक्षण संघ स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झालेले आहे, कालकथित आद. दादासाहेब रूपवते यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांचे स्मरण करून प्रतिमा पूजन करून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त माननीय ऍडव्होकेट संघराजरुपवते साहेबांनी प्रदर्शनाची उपयुक्तता सांगितली. सिद्धार्थ विद्यालयानेअनेक नामवंत माजी विद्यार्थी घडवलेले आहेत त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिकरावसाहेब कसबे, अकोले तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदारमधुकरराव पिचड साहेब. अशा व्यक्तींचा कार्य गौरव त्यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. दीपक त्रिभुवन साहेब (अधीक्षक- शालेय पोषण आहार ,पंचायत समिती ,संगमनेर यांनी केले. प्रदर्शन हा भारत सरकारचा शैक्षणिक उपक्रम आहे, प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत होते व त्यांच्या ज्ञानात भर पडते. संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी येणार आहेत त्या पद्धतीने नियोजन झाले आहे अशी माहिती त्यांनी दिली.  संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे साहेब यांनी परिसर स्वच्छता प्रदूषण निर्मूलन याविषयी माहिती दिली. विज्ञान शिक्षण ही काळाची गरज आहे त्यातूनच प्रदूषणाचे निर्मूलन शक्य आहे असे त्यांनी सांगितले. संगमनेर तालुका विज्ञान,गणित संघटनेचे अध्यक्ष मनोज उपरे सर व बाळासाहेब राऊत सर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले व भारतीय संविधानाची एक एक प्रत भेट दिली. प्रदर्शनास जवळपास १०० शाळांनी आपला सहभाग नोंदवला, सुमारे ३५० उपकरणांची नोंद घेण्यात आली. सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .रघुनाथ जगताप सर यांनी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवर शिक्षक, बालवैज्ञानिक यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक प्रकाश पारखे सर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने मुख्याध्यापक ,शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,आजी माजी मुख्याध्यापक उपस्थित होते.

COMMENTS