जळगाव प्रतिनिधी - शिंदे फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एसटी बस प्रवासात तिकीटामध्ये सरसकट 5

जळगाव प्रतिनिधी – शिंदे फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एसटी बस प्रवासात तिकीटामध्ये सरसकट 50% सुट दिल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी आजपासून संपूर्ण राज्यात होत असल्याने महिला वर्ग आता मोठ्या प्रमाणावर बसने प्रवास करताना दिसत आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील महिला आता 50% तिकीट दराने प्रवास करणार असल्याने एसटी बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर आता महिला दिसत आहे. ज्या महिलांना कुठल्याही कार्यक्रमाला अथवा बाहेर पडता येत नव्हतं. बस स्थानकात बसची वाट पाहताना महिला वर्ग मोठ्या संख्येत दिसत आहे. अशा सर्व महिला बसने प्रवास करताना दिसत आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत केले जात आहे. शासनाने नेहमी महिलांसाठी अशाच चांगल्या घोषणा कराव्यात, असे काही महिलांनी मत व्यक्त केलेले आहे.
COMMENTS