मध्य प्रदेश प्रतिनिधी - मध्य प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. '50
मध्य प्रदेश प्रतिनिधी – मध्य प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. ’50 टक्के कमिशन सरकार’च्या ट्विटवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींच्या अडचणी वाढू शकतात. प्रियंका गांधींच्या या आरोपावरुन भाजप आक्रमक झाला आहे. प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात मध्यप्रदेशात 41 हून अधिक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावरुन भाजपवर ५० टक्के कमिशनचे सरकार असा आरोप केला होता. या आरोपावरुन भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याचवेळी काँग्रेसकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अशाच प्रकारचा आरोप कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने भाजपावर केला होता. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेऊन काम करते, असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता.
COMMENTS