Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरगुती गॅस 50, व्यावसायिक 350 रुपयांनी महाग

मुंबई : देशात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या चटक्याबरोबर आता महागाईचे चटके देखील सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. बुधवारपासून म्हणजेच 1

सूनेकडून सेवानिवृत्त पोलीस सासर्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न| LOKNews24
महामंडळाची बस ५० प्रवाशांना घेऊन उलटली | LOKNews24
राहुरी तालुक्यात दुसरा डोस घेणारांना प्राधान्य ; लसीकरण नव्या पॅटर्नमुळे गर्दीवर नियंत्रण

मुंबई : देशात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या चटक्याबरोबर आता महागाईचे चटके देखील सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. बुधवारपासून म्हणजेच 1 मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे 50 तर व्यावसायिक सिलेंडर तब्बल 350 रुपयांनी महाग झाले आहे. यामुळे इतर वस्तूंच्या किमती देखील वाढणार आहे.

सरकारद्वारे घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे मासिक आर्थिक नियोजन बिघडणार आहे. आजपासून एलपीजी सिलेंडर्ससह अन्य अनेक गोष्टींच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आले आहेत. यानुसार दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 1103 रुपये झाली आहे. कमर्शियल एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये 350.50 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या गॅस सिलेंडर्सची किंमत 2,119.50 रुपये झाली आहे. 2022 मध्ये काही महिन्यांपूर्वी घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात 150 रुपयांनी केली गेली होती. तेव्हा व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलेंडर्सची किंमत 25 रुपयांनी वाढवण्यात आली होती. 6 जुलै 2022 पासून एलपीजी सिलेंडर्सच्या दरामध्ये बदस करण्यात आला नव्हता. होळीपूर्वी या दरांमध्ये वाढ होण्याची शंका व्यक्त केली जात होती. स्थानिक करांवरुन घरगुती गॅस सिलेंडर्सच्या किंमती अवंलबून असतात. राज्यानुसार त्यांच्या किंमतींमध्ये बदल पाहायला मिळतात. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या दरांबाबत माहिती प्रसिद्ध करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतींचा परिणाम देशांतर्गत गॅस सिलेंडर्सच्या किंमतींवर होत असतो. मुंबईत एलपीजीची किंमत 1052.50 रुपयांवरुन 1102.50 रुपये, कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 1079 रुपयांवरुन 1129 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1068.50 रुपयांवरुन 1118.50 रुपयांपर्यंत वाढली आहे.

COMMENTS