Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून घुसखोरी सुरूच असल्याचे समोर आले आहे. कुलगाम जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने 5

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही उभी फूट
दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा : मुख्यमंत्री फडणवीस
राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

श्रीनगर : जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांकडून घुसखोरी सुरूच असल्याचे समोर आले आहे. कुलगाम जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याचदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार सुरक्षालदांना कुलगाममध्ये दहशतवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. गुप्तहेरांकडून मिळालेल्या टीपनंतर भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या परिसरता शोध मोहिम हाती घेतली. सर्च ऑपरेशन दरम्यान कुलगाम जिल्ह्यातील कद्दर भागात जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. यावेळी जवानांनी संशयितांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. परंतु, संशयितांनी सैन्यावरच गोळीबार सुरू केला. यात 2 जवान जखमी झालेत. त्यानंतर जवानांनी तत्काळ पोजिशन घेत जिहादी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. यामध्ये आतापर्यंत 5 दहशतवादी ठार झाले असून सैन्याने या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दरम्यान या परिसरात अजूनही गोळीबाराचे आवाज येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

COMMENTS